• Home
  • महाराष्ट्र
  • रांजणगावमध्ये नोकरीच्या आमिषाने मोठी फसवणूक; सुमारे 47 तरुण-तरुणींची सुटका, दोन आरोपी ताब्यात
गुन्हा

रांजणगावमध्ये नोकरीच्या आमिषाने मोठी फसवणूक; सुमारे 47 तरुण-तरुणींची सुटका, दोन आरोपी ताब्यात

Police rescue youth in Ranjangaon job scam case

Ranjangaon job scam : रांजणगाव एमआयडीसी परिसरात देश-विदेशातील नामांकित कंपन्यांत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुण-तरुणींची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर एक आरोपी फरार आहे.

काय आहे प्रकरण :

फिर्यादी मुन्ना राजू शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी एमएसएफ फोर्स एजन्सी या दुबईतील नामांकित कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवत 8 तासांचे काम आणि 16 हजार रुपये पगाराचे आश्वासन दिले होते. ड्रेस व किटच्या नावाखाली प्रत्येकाकडून पैसे घेऊन एकूण सुमारे 70 हजार रुपयांचा अपहार करण्यात आला.

हे ही वाचा : घाम गाळून पिकवलेलं धान शेतातून चोरीला; पोलिसांत तक्रार दाखल

आरोपींनी केली शिवीगाळ दमदाटी

इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क साधत 37 युवक व 10 युवती अशा सुमारे 47 तरुण-तरुणींना रांजणगाव गणपती येथील सुखकर्ता लॉन्स/मंगल कार्यालय येथे बोलावून ठेवण्यात आले होते. मात्र नोकरी न देता पैसे परत मागितल्यावर आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे.

आरोपी फरार

या घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांच्या मदतीने सर्व तरुण-तरुणींची सुखरूप सुटका करण्यात आली. या प्रकरणात अवध कलीम बिनसाद आणि ज्ञानेश्वर महादेव धायतडक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अमोल आवटे हा आरोपी फरार आहे. पुढील तपास रांजणगाव पोलीस करत असून फसवणुकीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts