Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • घाम गाळून पिकवलेलं धान शेतातून चोरीला; पोलिसांत तक्रार दाखल
गुन्हा

घाम गाळून पिकवलेलं धान शेतातून चोरीला; पोलिसांत तक्रार दाखल

Farmer files police complaint after hard-earned crop stolen from farm

farm crop theft case : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील चिंधीचक गावातून एक अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे. येथील शेतकरी विश्वनाथ सातपैसे यांनी आपल्या कुटुंबासह अहोरात्र मेहनत करून धानाचे पीक उभे केले होते. अस्मानी आणि सुलतानी संकटांशी दोन हात करत, कर्जाचा डोंगर उपसत त्यांनी हे पीक काढलं होतं. मात्र, काल रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या या मेहनतीवर पाणी फेरलं.

३४ पोत्यांपैकी तब्बल १२ पोती मध्यरात्री लंपास

शेतात साठवून ठेवलेल्या एकूण ३४ पोत्यांपैकी तब्बल १२ पोती धानाची चोरट्यांनी मध्यरात्री लंपास केली. ही चोरी महामार्गापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतातून झाली आहे. सकाळी जेव्हा विश्वनाथ शेतात पोहोचले, तेव्हा रिकामी जागा पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

हे ही वाचा : सायबर फसवणूक प्रकरणात खळबळ: अमर सिंह चहल आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तपासाला वेग

तक्रार दाखल

नागभीड तालुक्यात सध्या चोरीच्या घटना वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी विश्वनाथ सातपैसे यांनी नागभीड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

न्याय मिळवून देण्याची विनंती

ही चोरी केवळ धान्याची नाही, तर एका कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पीडित शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा, हीच आता ग्रामस्थांची मागणी आहे. कष्टांनी पिकवलेलं धान… एका रात्रीत हिरावलं गेलं… ही केवळ चोरी नाही, तर ही आहे एका शेतकऱ्याच्या आयुष्यावर केलेली घाला!

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts