• Home
  • बिजनेस
  • देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार; प्रवाशांना मिळणार दर्जेदार सुविधा
ताज्या बातम्या

देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार; प्रवाशांना मिळणार दर्जेदार सुविधा

Holi Special Train

First Vande Bharat Sleeper : देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच रुळांवर धावणार आहे. तिचं वैशिष्ट्य म्हणजे जपान आणि चीनमध्ये धावणाऱ्या सेमी-हाय-स्पीड ट्रेनप्रमाणे तिची रचना करण्यात आली आहे. ती दिसायला सुंदर आहे आणि तिचा रंग पिवळा आणि राखाडी आहे, जो डोळ्यांना खूप आनंद देतो.

इतर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? :

प्रवाशांच्या सोयीसाठी, रिडींग लॅम्प, सॉकेट आणि मोबाईल होल्डर स्वतंत्रपणे प्रदान केले आहेत. ट्रेनच्या विश्रांती क्षेत्रात गरम पाणी उपलब्ध आहे. ट्रेनमध्ये (First Vande Bharat Sleeper) बसल्यानं विमानासारखा अनुभव मिळतो. एक स्वतंत्र पेंट्री क्षेत्र आणि अन्न गरम आणि थंड करण्याची मशीनही आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ट्रेनमधून निर्माण होणारा कचरा ट्रेनमध्येच विघटित केला जाईल. ट्रेनची गती, स्वच्छता आणि आरामासाठी काळजीपूर्वक डिझाइन केली गेली आहे. सुरक्षिततेसाठी, ट्रेनमध्ये आधीच कवच सिस्टम बसवण्यात आली आहे आणि कॅमेरा एआयशी जोडलेला आहे. याशिवाय ट्रेनमध्ये अग्निरोधक प्रणाली आहे, जी आग एका डब्यातून दुसऱ्या डब्यात पसरण्यापासून रोखते.

कर्मचाऱ्यांसाठीही खास व्यवस्था :

ट्रेन कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रांती क्षेत्र देखील तयार करण्यात आलं आहे. भारतीय रेल्वेच्या ताफ्यात नव्यानं समाविष्ट झालेली ही नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच कोलकाता-गुवाहाटी मार्गावर धावणार आहे.

पंतप्रधान मोदींचा डबल स्ट्रोक :

बंगाल आणि आसामच्या निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींचा हा डबल मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकातामधील हावडा ते आसाममधील गुवाहाटी पर्यंत धावेल. या ट्रेनमुळं दोन्ही राज्यांमधील कनेक्टिव्हिटी आणखी सुधारेल. ही ट्रेन दोन राज्यांना जोडत असल्यानं, दोन्ही राज्यांमधील स्थानिक खाद्यपदार्थ देखील ट्रेनमध्ये दाखवले जातील. कोलकात्याचा रसगुल्ला आणि आसामची प्रसिद्ध थाळी देखील दिली जाईल. कोलकाता-आसाम मार्ग रेल्वेवरील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक मानला जातो आणि नवीन ट्रेनच्या आगमनाचा वाहतुकीवरही परिणाम होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts