Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • पुण्याजवळ वंदे भारत एक्सप्रेसचा एक डबा रुळावरुन घसरला; सुदैवानं जीवितहानी नाही
Pune

पुण्याजवळ वंदे भारत एक्सप्रेसचा एक डबा रुळावरुन घसरला; सुदैवानं जीवितहानी नाही

Vande Bharat sleeper train standing at the railway station with passengers and staff near the platform

पुणे Vande Bharat Derail : पुणे स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी वंदे भारत एक्सप्रेसचा (मुंबई-सोलापूर) प्लॅटफॉर्मवर प्रवेश करताना ट्रेनचा चौथा डबा डायमंड क्रॉसिंगवर रुळावरुन घसरला. या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नाही आणि सर्वजण सुरक्षित आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा : मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठीचा मराठी बंधनकारक, निर्णय ६ महिने

कसा घडला अपघात? :

ही घटना सायंकाळी 7:30 च्या सुमारास घडली, जेव्हा रेल्वे पुणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करत होती, त्याचवेळी चौथ्या डब्यातील एक ट्रॉली डायमंड क्रॉसिंगवर रुळावरून घसरली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या अपघातात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत.

प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था :

प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना दुसऱ्या ट्रेनमध्ये (रॅकमध्ये) हलवण्याची योजना आखण्यात आली आहे, जेणेकरून त्यांचा प्रवास कोणताही विलंब न होता पूर्ण होऊ शकेल. मिळालेल्या माहितीनुसार, हे डायमंड क्रॉसिंग भारतीय रेल्वेच्या पुणे स्टेशनवरील यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाचा एक भाग आहे, जिथं ट्रॅक अपग्रेडेशनचं काम आधीच नियोजित आहे.

वंदे भारत ट्रेन पहिल्यांदाच रुळावरुन घसरली :

रुळावरून घसरलेली ही पहिलीच वंदे भारत ट्रेन आहे. 2019 ते 2026 या कालावधीतील ही पहिलीच अशी घटना आहे. आतापर्यंत वंदे भारत ट्रेनला अतिशय सुरक्षित ट्रेन मानलं जात होतं, कारण त्यात आधीच कवच प्रणाली बसवलेली होती. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ट्रेन रुळावरून घसरली, परंतु कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळं पुणे मार्गावरील प्रमुख एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम झाला आहे.

मुंबई-सोलापूर दरम्यान धावणारी वेगवान ट्रेन :

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (22225/22226) ही मुंबई (CSMT) ते सोलापूर दरम्यान जवळपास सहा तासात पोहचवणारी वेगवान ट्रेन आहे. ही गाडी दर आठवड्यातून 6 दिवस (बुधवार वगळता) धावते. ही ट्रेन दादर, ठाणे, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी मार्गे सोलापूरला जाते. ही ट्रेन अत्याधुनिक सोयीसुविधांसह सुमारे 455 किमीचा प्रवास पूर्ण करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts