• Home
  • महाराष्ट्र
  • देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरु होणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट; प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण
ताज्या बातम्या

देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरु होणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट; प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण

Vande Bharat sleeper train standing at the railway station with passengers and staff near the platform

Vande Bharat sleeper train launch date : देशातील सर्वात प्रीमियम प्रवासाला एक नवीन ओळख देणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या स्लीपर आवृत्तीबाबत अखेर एक मोठी अपडेट आली आहे. वर्षानुवर्षे वाट पाहिल्यानंतर आणि अनेक वेळा लाँच तारखेला पुढं ढकलल्यानंतर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही आलिशान स्लीपर ट्रेन पुढील डिसेंबरमध्ये सुरु होणार असल्याची पुष्टी केली आहे. याचा अर्थ असा की प्रवाशांचं आरामदायी, जलद आणि उच्च तंत्रज्ञानाच्या ट्रेन प्रवासाचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या पहिल्या रेकच्या चाचणी दरम्यान काही किरकोळ त्रुटी आढळून आल्या. त्यामुळं, बोगी, सीट आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये काही बदल करण्याची शिफारस करण्यात आली. या सर्व सुधारणांवर काम आता वेगानं सुरु आहे. रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की बदल लहान असले तरी ते खूप गांभीर्यानं घेतले जात आहेत, कारण आमचं ध्येय प्रवाशांसाठी आरामदायी प्रवास सुनिश्चित करणं आहे. त्यांनी असंही सांगितलं की ही ट्रेन येणाऱ्या पिढ्यांसाठी एक आलिशान ट्रेन असेल, त्यामुळं काहीही घाई केली जाणार नाही.

हे हि वाचा : आज गोव्यात होणार 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उदघाटन; नऊ दिवस चालणार हा महोत्सव

पहिला रेक BEML ला परत :

वंदे भारत स्लीपर ट्रेन्स बनवणाऱ्या BEML नं पुष्टी केली आहे की प्रोटोटाइप रेक त्यांना रेट्रोफिटिंगसाठी परत करण्यात आला आहे. RDSO आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीखाली ट्रेननं अनेक चाचण्या घेतल्या. BEML च्या अधिकाऱ्यानुसार, हा एक प्रोटोटाइप असल्यानं, सर्व सुरक्षा आणि आराम पॅरामीटर्सवर त्याची व्यापक चाचणी होणं स्वाभाविक आहे. सुचवलेले सर्व बदल अंमलात आणले जात आहेत.

सुरक्षितता आणि आरामासाठी नवीन मानकं :

RDSO ला लिहिलेल्या पत्रात, रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे की भविष्यातील गाड्यांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले जातील, जसं की अग्निसुरक्षेसाठी आर्क फॉल्ट डिटेक्शन डिव्हाइसेस, एसी डक्टसाठी नवीन स्थानं, सीसीटीव्हीसाठी अग्नि-बचाव केबल्स, युरोपियन अग्नि आणि क्रॅश मानकांचे तृतीय-पक्ष ऑडिट आणि आपत्कालीन अलार्म बटणांसाठी नवीन स्थाने. शिवाय, ट्रेनच्या फर्निशिंग आणि कारागिरीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी सुधारणा केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts