RailOne App: तुम्हालाही रेल्वेने स्वस्तात मस्त प्रवास करायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. घरबसल्या RailOne ॲपवर जनरल तिकीट बुक करून ३ टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे. नेमकी ही योजना काय आहे, कोणाला आणि कसा फायदा होणार, तसेच यासाठी कोणत्या अटी आहेत, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या खास लेखातून.
रेल्वेने जनरल ( अनारक्षित) तिकीट घेणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची सुविधा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. RailOne ॲपद्वारे ऑनलाईन अनारक्षित तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना एकूण भाड्यावर ३ टक्के सवलत मिळणार असून, ही योजना ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू राहणार आहे.
हेही वाचा: उपोषणाच्या १९व्या दिवशी वांगचुकांसाठी राज ठाकरेंची पोस्ट; केंद्र सरकारवर साधला निशाणा, म्हणाले….
ऑनलाईन तिकीट बुकिंगवर थेट बचत
RailOne ॲपद्वारे जनरल किंवा अनारक्षित तिकीट बुक केल्यास प्रवाशांना तिकिटाच्या एकूण भाड्यावर ३ % सूट मिळेल. त्यामुळे डिजिटल पद्धतीने तिकीट काढणाऱ्या प्रवाशांचा खर्च कमी होणार आहे.
कोणत्या पेमेंटवर मिळेल सवलत?
ही सवलत सर्व प्रमुख डिजिटल पेमेंट पर्यायांवर उपलब्ध आहे. यामध्ये UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग यांपैकी कोणत्याही माध्यमातून पेमेंट केल्यास प्रवाशांना ३% सवलतीचा लाभ मिळू शकतो.
📢 Big News for Railway Passengers!
Indian Railway extends the 3% discount/bonus scheme on the RailOne App till 31 March 2027! 🎟️📱✨ The Benefits:Instant 3% off via UPI, Debit/Credit Card, & Net Banking.
No long queues at the station counter.100% paperless and eco-friendly… pic.twitter.com/WpcZwVlxPt— Jammu Division NR (@Drm_Jammu) July 15, 2026
रांगेत उभे राहण्याची गरज नाही
पूर्वी जनरल तिकीट घेण्यासाठी स्टेशनवरील तिकीट खिडकीवर लांब रांगा लागायच्या. आता RailOne ॲपच्या मदतीने प्रवासी घरबसल्या किंवा प्रवासाला निघण्यापूर्वीच तिकीट बुक करू शकतात. त्यामुळे वेळेची बचत होते आणि स्टेशनवरील गर्दीही कमी होते.
डिजिटल तिकीटाचे फायदे
ऑनलाइन बुक केलेले तिकीट मोबाईलमध्ये सुरक्षित राहते. त्यामुळे कागदी तिकीट हरवण्याचा प्रश्न राहत नाही. स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच तिकीट बुक करून प्रवासी थेट प्रवासाला सुरुवात करू शकतात.
फक्त ही अट लक्षात ठेवा
रेल्वेच्या माहितीनुसार, RailOne ॲपवर बुक केलेले तिकीट इतर ॲप्स किंवा प्लॅटफॉर्मवर (उदा. WhatsApp) वैध मानले जाणार नाही. तिकीट दाखवण्यासाठी ते RailOne ॲपमध्येच उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच, तिकीट बुक करणारा मोबाईल क्रमांक RailOne ॲपवर नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.









