• Home
  • महाराष्ट्र
  • पुणेकरांसाठी खुशखबर! आणखी एक एक्सप्रेस धावणार; जाणून घ्या कुठे थांबणार आणि किती तिकीट?
Pune

पुणेकरांसाठी खुशखबर! आणखी एक एक्सप्रेस धावणार; जाणून घ्या कुठे थांबणार आणि किती तिकीट?

Pune railway

Amrit Bharat Express: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातून आणखी एक नवी एक्सप्रेस धावणार असून, ती कोणत्या स्थानकांवर थांबणार आणि तिकीटाचे दर किती असतील, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पुणे आणि उत्तर भारत यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी नवीन पाऊल उचलण्यात आले आहे. हडपसर (पुणे) ते वाराणसी दरम्यान धावणारी अमृत भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार असून, या गाडीमुळे प्रवाशांना थेट, सोयीस्कर आणि तुलनेने जलद प्रवासाचा पर्याय मिळणार आहे.

हेही वाचा: ठाणे–बोरिवली प्रवास होणार वेगवान! अवघ्या 15–18 मिनिटांत अंतर कापता येणार; काय आहे नवा मेगा प्रोजेक्ट?

ही नवीन एक्स्प्रेस २४ एप्रिलपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. हडपसर टर्मिनलवरून सुटणारी ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यास मदत करेल.

अमृत भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये

अमृत भारत एक्सप्रेस ही एजं २२ डब्ब्यांची लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार करण्यात आलेली ट्रेन आहे. यात प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सोयींना प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच स्लीपर आणि जनरल श्रेणी, दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे,आग शोध प्रणाली आणि सुधारित सुरक्षा यंत्रणांची सोय आहे.

कोणत्या स्थानकांवर थांबे असण्याची शक्यता?

अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर झालेले नसले तरी खालील प्रमुख स्थानकांवर थांबे असण्याची शक्यता आहे.

हडपसर (पुणे)
दौंड
मनमाड जंक्शन
भुसावळ जंक्शन
खंडवा
इटारसी जंक्शन
जबलपूर
कटनी जंक्शन
प्रयागराज जंक्शन
वाराणसी (बनारस)

तिकीट दर किती असू शकतात?

हडपसर ते वाराणसी हे अंतर साधारण १४५० ते १५५० किमी आहे.
जनरल क्लास: 350 ते 450 रुपये
स्लीपर क्लास: 650 ते 750 रुपये

ही दररचना सामान्य मेल/एक्सप्रेस गाड्यांपेक्षा थोडी जास्त असू शकते, कारण या ट्रेनमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध असतील.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts