Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • शरद पवारांना रूग्णालयात केलं दाखल, सुप्रिया सुळेंनी प्रकृतीबाबत दिली मोठी माहिती
Top News

शरद पवारांना रूग्णालयात केलं दाखल, सुप्रिया सुळेंनी प्रकृतीबाबत दिली मोठी माहिती

pawar sule

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना आज (21 एप्रिल) रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती अस्वास्थामुळे शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे.

हेही वाचा – बनावट जात प्रमाणपत्र वादावर सहर शेखची स्पष्ट भूमिका, म्हणाली, “मी कायदेशीररित्या उत्तर देईन…”

शरद पवारांच्या प्रकृतीबाब सुप्रिया सुळेंनी काय दिली माहिती?

प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी शरद पवारांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, शरद पवारांना काही वैद्यकीय चाचण्यांसाठी आणि नियमित तपासणीसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्या विविध चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे जेव्हा या वैद्यकीय चाचण्यांचा रिपोर्ट येईल त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत अधित स्पष्टता येईल, अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली आहे. तसेच शरद पवारांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे ते आज बारामतीला जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांचं वय लक्षात घेता, त्यांची प्रकृती पाहता एक खबरदारी म्हणून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती सामन्य आहे. तसेच त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या डॉक्टर करत आहेत. त्यामुळे आता या चाचण्यांचा अहवाल आल्यानंतरच डॉक्टर पुढील उपचाराबाबत आणि त्यांना डिस्चार्ज देण्याबाबत निर्णय घेणार आहेत.

दरम्यान, मागील महिन्यातच शरद पवारांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. अशातच आता आज पुन्हा एकदा शरद पवारांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts