Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • मेरठ प्रकरणावर आधारित डॉक्यु सीरिजचे पहिले पोस्टर आले समोर; 9 जानेवारीला या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
मनोरंजन

मेरठ प्रकरणावर आधारित डॉक्यु सीरिजचे पहिले पोस्टर आले समोर; 9 जानेवारीला या OTT प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

First poster of docu series based on the Meerut case set to stream on OTT platform from January 9

Honymoon se hatya : 2025 या वर्षात मेरठ येथी हत्याकांड प्रकरण फारच चर्चेत आले होते. 4 मार्च 2025 रोजी घडलेल्या सौरभ हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. याप्रकरणात मुस्का हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने तिच्या स्वतःच्या नवऱ्याची म्हणजेच सौरभ राजपूतची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून निळ्या ड्रम मध्ये सिमेंटच्या मिश्रणात सील केले होते. आज पुन्हा या त्त्याकांडची आठवण झाली. कारण या गाजलेल्या हत्याकांडवर आधारित डॉक्यु सिरीज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण zee 5 ने या डॉक्यु सीरिजचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले असून या सिरीजची रिलीज देत देखील समोर आली आहे.

हे ही वाचा : 2026 या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार या खास वेबसिरीज

काय आहे पोस्ट मध्ये

ही डॉक्यु सिरीज zee 5 या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. zee 5 ने या डॉक्यु सिरीजची अधिकृत घोषणा केली असून त्याचे पहिले पोस्टर देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये निळा ड्रम दाखवण्यात आला असून सिमेंटमध्ये अडकलेला एक हात स्पष्टपणे दिसत आहे. तर या पोस्ट मध्ये Honymoon se hatya : why women kill . ” सगळं काही हॅप्पी एंडिंगसारखं वाटत होतं, पण मग ….. तसं झालेच नाही.” अशा आशय लिहिण्यात आला आहे. हि सिरीज 9 जानेवारी रोजी Zee 5 वर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

काय होते हे प्रकरण (Meerut case docu series first poster)

मेरठ येथील शास्त्रीनगर परिसरात घडलेले भयानक हत्याकांड प्रत्येकाच्या मनात या पोस्टच्या माध्यमातून ताजे झाले. मुस्कानने आपल्या प्रियकर साहिलच्या मदतीने सौरभच्या हत्येचा चालाखीने कट रचला होता. 26 फेब्रुवारी 2025 ला सौरभ राजपूत हा मेरठला आला. मर्चंट नेव्हीत कार्यरत असलेला सौर कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी घरी आला. इकडे त्याची पत्नी त्याला मारण्याचा डाव रचत होती. याची सौरभला काडीमात्र देखील भनक नसेल. सध्या या प्रकरणातील आरोपी मुस्कान आणि साहिल तुरुंगात आहे. या डॉक्यु सिरीजमध्ये थरारक, हादरवून टाकण्यात येणाऱ्या घटनेची सवसितर कहाणी दर्शविण्यात येणार आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts