Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • मुंबईत मराठी टक्का घसरला…; नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप
Top News

मुंबईत मराठी टक्का घसरला…; नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप

Marathi population decline in Mumbai- bjp MLA nitesh raane said about in meeting
105

Marathi population decline in Mumbai : मुंबईत गेल्या काही वर्षांत मराठी माणसांचे प्रमाण कमी झाले असून, बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांची संख्या ३० टक्क्यांनी वाढल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी एका जाहीर सभेत केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील महापालिकेवर जोरदार निशाणा साधला आहे.

नेमके काय म्हणाले नितेश राणे?

एका निवडणूक प्रचारादरम्यान बोलताना नितेश राणे म्हणाले की, “उद्धव ठाकरे आणि त्यांचे लोक मराठी-मराठीचा जप करतात, पण त्यांच्याच सत्ताकाळात मुंबईतील मराठी टक्का का घसरला? आज मुंबईतील मराठी माणूस वसई, विरार, कल्याण, डोंबिवलीकडे का फेकला गेला? याशिवाय दोन्ही ठाकरे मराठीचा मुद्दा काढतात. मला आश्चर्य वाटत की आम्ही मराठी हिंदू नाही का? आमच्या हिंदूत फूट पाडली जाते. उद्धव ठाकरे हिंदू आहे का हे तपासावे लागेल. कुठल्याही अँगल ने तो बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा वाटत नाही.”

राणे पुढे म्हणाले की, “एकीकडे मराठी टक्का कमी होत असताना, दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने मुंबईत बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांची संख्या 30 टक्क्यांनी वाढली आहे. या घुसखोरांना मतदान कार्ड, पाणी आणि वीज कनेक्शन देऊन त्यांना सर्व अधिकार दिले जात आहेत, जे खरं तर इथल्या स्थानिक लोकांचे हक्क आहेत.”

हे ही वाचा :  28 जानेवारी ते 2 एप्रिल पर्यंत चालणार संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; दोन टप्प्यात होणार अधिवेशन

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आवाहन

येणारी महापालिका निवडणूक मुंबईच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत राणे यांनी मतदारांना सावध केले. “जर तुम्ही आशाताईंसारख्या हिंदुत्ववादी विचारांच्या प्रतिनिधीला निवडून दिले नाही, तर उद्या तुमचे हक्काचे पाणी आणि वीजही हे लोक बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना देऊन टाकतील,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मुंबईची सत्ता ही ‘आय लव्ह महादेव’ म्हणणाऱ्यांकडेच असली पाहिजे, असे सांगत त्यांनी जनतेला भाजप-महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

तुझ्या बापाचे हे पाकिस्तान आहे का ?

तुम्हाला आपल्या मुंबईत जय श्रीरामचे नारे ऐकायचे आहेत की सर तन से जुदा हे ठरवायचे आहे. ओवेसी सोलापूर मध्ये सांगतो की इथे बुरखावाला पंतप्रधान झाला तर काय फरक पडतो…. तुझ्या बापाचे हे पाकिस्तान आहे का ? रात्र वैऱ्याची आहे ही निवडणूक जय श्री राम विरुद्ध सर तन से जुदा वाली आहे. ही निवडणूक आय लव्ह महादेव विरुद्ध आय लव्ह मोहम्मदची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts