constitution insult accused suicide : परभणी जिल्ह्यात 1 वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची विटंबना केल्याचा प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 डिसेंबर 2024 रोजी संविधानाची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर विटंबना करणारा आरोपी दत्ता सोपान पवार याला अटक करण्यात आली होती. त्याने मिर्झापूर गावातील एका शेतात असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याला 4 महिन्यांपूर्वीच जामीन मिळाला होता. त्यानंतर त्याने आत्महत्या करून जीवन संपवले.
हे ही वाचा : अवैध मद्यवाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; तब्बल ७१ लाख लाखांचा मुद्देमाल जप्त
मृत आरोपी दत्ता पवार याला तब्बल 13 महिन्यानंतर म्हणजेच 1 वर्ष 1 महिन्यांनंतर जामीन मिळाला होता त्यानंतर आपल्या गावी मिर्झापूर याठिकाणी तो गावाकडे राहण्यास आला होता. आरोपी दत्ता सोपान पवार याला जमानत मिळवून देण्यासाठी कोणीही समोर येण्यास तयार नव्हते. म्हणून त्याला मोफत विधी सल्ला यांच्यामार्फत वैयक्तिक बाँडवर जमानत देण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार दत्ता पवार हा कुटुंबापासून दुरावल्याने डिप्रेशनमध्ये होता, तो कारागृहात असताना देखील त्याच्यावर मानसोपचार तज्ञांकडून उपचार सुरू होते, अशातच त्याने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची विटंबना केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला 13 महिन्यानंतर जामिनावर सोडवण्यात आले होते.












