Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • नॉमिनेशन टास्क मध्ये तन्वीने कापला सागर कारंडेचा पतंग; दोघांमध्ये अफलातून वाद
मनोरंजन

नॉमिनेशन टास्क मध्ये तन्वीने कापला सागर कारंडेचा पतंग; दोघांमध्ये अफलातून वाद

Tanvi Sagar Karande argument

Tanvi Sagar Karande Argument : बिग बॉस मराठी सिझन 6 ला दोन दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. 17 स्पर्धकांची या सिझन मध्ये एंट्री झाली असून पहिल्याच दिवशी या स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे बघायला मिळाले. आता या बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क सुरु झाले असून दोन स्पर्धकांमध्ये वादविवाद झाल्याचे बघायला मिळाले. या नॉमिनेशन टास्कचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

काय आहे प्रोमोमध्ये

या प्रोमो मध्ये नेहमी शांत राहणारा सागर कारंडे आणि आक्रमक पवित्रा घेणारी तन्वी यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटल्याचे बघायला मिळाले. पहिल्या नॉमिनेशन टास्कवेळी तन्वीने सागर कारंडे यांचा फोटो असलेला पतंग कापला. आणि सागर कारंडे या शो साठी अपात्र असल्या म्हणत तिने तिखट शब्दात खळबळजनक वक्तव्य देखील तिने केले आहे. तन्वीने घेतलेल्या या भूमिकेने सागर प्रचंड तबल्याचे दिसून येत असून दोघांमध्ये वादविवाद झाल्याचे बघायला मिळाले.

हे ही वाचा : बरं झालं देवाने मला मुलगी दिली नाही…! कॉमेडियन भारती सिंहने केले हे वक्तव्य

काय आहे वाद

तन्वीच्या आरोपांना उत्तर देत असतांना सागर म्हणाला कि, एवढी तरी अक्कल पाहिजे कि, काय बोलतोय आपण ? यावर तन्वीने प्रत्युत्तर देत मी नॉन्सेन्स आहे, तुम्हाला बोलायची गरज नाहीये असं ठणकावून सांगितलं. त्यानंतर सागर कारंडे रागाच्या भरात मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाहीअसं म्हणतो. यावर मी तुझ्या आवाजाला घाबरत नाही, तू मला शिकवणार असा वादविवाद करत प्रत्युत्तर दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आता सागर कारंडे आणि तन्वी यांच्यातील हा वाद कोणत्या ठरला जाणार हे पाहणे गरजेचे आहे. आता प्रेक्षकांना या पुढे काय होणार याकडे लक्ष लागून असून कोण खरं आणि कोण खोटं आणि या वादाचे नेमके कारण काय हे पाहणे योग्य ठरणार आहे. आणि आता बिग बॉस मराठी सिझन 6 मध्ये कोण नॉमिनेट होणार आणि कोण सेफ होणार हे पुढील भागात पाहणे योग्य ठरेल.

चाहत्यांचा कमेंटचा वर्षाव

बिग बॉस सिझन 6 हा रिऍलिटी शो कलर्स मराठीवर सायंकाळी 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत असून तुम्ही हा शो जीओ हॉटस्टारवर पाहू शकतात. सोशल मीडियावर कलर्स मराठीने या नॉमिनेशन टास्कचा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. यावर चाहत्यांनी तुफान कमेंट्स केल्या असून अनेकांनी सागर कारंडे यांना सपोर्ट केल्याचे बघायला मिळत आहे. चाहत्यांनी या पोस्टवर भरमसाठ कमेंट्स, लाईकचा वर्षाव करत बिग बॉस वर त्यांचे प्रेम यातून दिसून येत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts