Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • पुणे महापालिकेतील ‘बिग फाईट्स’ भल्याभल्यांची हवा ताईट
Top News

पुणे महापालिकेतील ‘बिग फाईट्स’ भल्याभल्यांची हवा ताईट

Pune Municipal Corporation Big Fights

Pune Municipal Corporation Big Fights : राज्यातील २९ महापालिका निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाचा वारु चौफेर उधळला असून त्याचा मोठा प्रभाव पुणे पालिकेवर पडलाय. विरोधकांचा फडशा पाडतानाच भाजपने महायुतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाला आणि अजित पवार गटालाही दणका दिलाय. पुण्यात बिग फाईट्स ठरलेल्या काही महत्त्वाच्या जागांचा थोडक्यात आढावा घेऊया..

पुणे महापालिकेत संपूर्ण शहराचे लक्ष असलेल्या ‘बिग फाईट्स’मध्ये प्रभाग क्रमांक ९ ड चा समावेश आहे. इथे भाजपचे लहू बालवडकर आणि राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर यांच्यात थेट लढत झाली रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरू होती. मात्र शेवट गोड तर सर्वच गोड म्हणत अमोल बालवडकर यांनी लहू बालवडकर यांचा ९०३ मतांनी पराभव केला अन् मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील धक्का दिला.

हेही वाचा – अटीतटीच्या निवडणुकीत सर्वात कमी फरकाने जिंकलेल्या ‘या’ आहेत महत्त्वाच्या जागा

सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर विजयी

आयुष कोमकर हत्याप्रकरणात तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना प्रभाग क्रमांक 23 मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्या दोघींचे निकाल काल समोर आले अन् सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बदला. सोनाली आंदेकरसह लक्ष्मी आंदेकरचा निवडणुकीत विजय झाला आहे, तर याच प्रभागातून शिवसेना नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झालाय. लक्ष्मी आंदेकर यांनी भाजपच्या ऋतुजा गडाळे यांचा १४१ मतांनी पराभव केलाय.

वसंत मोरेंना भाजपने दाखवलाय कात्रजचा घाट

पुण्यातील डॅशिंग नेते अशी ओळख असलेले ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांना पुणे महापालिकेत मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे यांनी महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या मुलाला लॉन्च केलं होतं. वसंत तात्यांनी आपला लाडका लेक रुपेश मोरे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता. अशातच वसंत मोरेच्या लेकाचा घरच्या मैदानावर सपाटून पराभव झाला आहे. त्यामुळे आता कात्रजचा घाट दाखवतो म्हणाऱ्या वसंत मोरे यांना अन् यांच्या मुलाला भाजपने कात्रजचा घाट दाखवलाय.

गणेश बीडकरांनी 2017 च्या पराभवाचा वचपा काढला

पुण्यात गणेश बीडकरु विरुद्ध माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे पुत्र प्रणव धंगेकर यांच्या लढतीकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. यामध्ये गणेश बीडकर यांनी बाजी मारलीय. बीडकरांनी 2017 च्या रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या पराभवाचा वचपा काढलाय. धंगेकरांचा मुलगा प्रणव आणि रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा यांचा देखील पराभव झालाय यामुळे त्यांना जोराचा धक्का बसलाय. पत्नीचा प्रभाग क्रमांक 23 मधुन पराभव तर मुलगा प्रणवचा प्रभाग क्रमांक 24 मधुन पराभव झाला आहे.

प्रभाग क्रमांक ३७ मध्ये भाजपने दिला क्लिन स्वीप

पुणे महानगरपालिका निवडणुकीत लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग क्रमांक ३७ मध्ये भाजपने क्लिन स्वीप दिलाय. या निकालाने राज्याचे माजी मंत्री आणि शिंदे सेनेचे आमदार तानाजी सावंत यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. सावंत यांनी या निवडणूकीत आपल्या मुलगा गिरीराज सावंत याला लाॅन्च केलं होतं. मात्र, यामध्ये त्यांना पराभव स्विकाराला लागलाय. त्यामुळे हा सावंत यांच्यासाठी राजकीय धक्का मानला जात आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts