Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ‘….तर नामोनिशाण संपवून टाकू’ वनमंत्री गणेश नाईकांनी साधला उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंवर निशाणा
Top News

‘….तर नामोनिशाण संपवून टाकू’ वनमंत्री गणेश नाईकांनी साधला उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंवर निशाणा

Ganesh Naik Targets Eknath Shinde

Ganesh Naik Targets Eknath Shinde : राज्यात नुकत्याच महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम पार पडला. या निवडणुकीपूर्वी नवी मुंबईध्ये वनमंत्री गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा सामना बघायला मिळाला. त्यांच्या वक्तव्याने आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण वनमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लक्ष साधत आक्रमक विधान केले आहे.

भाजपने जर परवानगी दिली तर नामोनिशाण संपवून टाकू

भाजप हा शिस्त पाळणारा पक्ष आहे. भाजपने जर परवानगी दिली तर नामोनिशाण संपवून टाकू, मी आज परत बोलतो, पक्षाने आदेश दिला म्हणून आम्ही ते मान्य केले. मनाला पटले नसले तरीही कार्यकर्त्यांनी सहन केले. पक्ष नेतृत्वाचा निर्णय आम्ही मान्य केला असं म्हणत वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर थेट निशाणा साधला.

हे ही वाचापद्म पुरस्कार २०२६ ची घोषणा! महाराष्ट्रातील खालील व्यक्तींचा पुरस्कारने सन्मान

परंतु काही ठिकाणी ती संधी मिळाली नाही

एकेकाळी मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ठाणे जिल्ह्यामध्ये मुंबई महानगर प्रदेशामध्ये महायुतीमधील सर्व कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे लढू द्या. त्यानंतर ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून येतील, त्यांना मित्र पक्षांनी पाठिंबा द्यावा आणि उर्वरित पदांची वाटणी करावी, असं माझं मत होतं, ही बाब मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील सांगितली असल्याचे गणेश नाईक यांनी स्पष्ट केले. यावर होकार नकार काहीही आलं नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु काही ठिकाणी ती संधी मिळाली नसल्याचे सांगत गणेश नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.

पक्षाला जे मान्य होते तेच आम्ही मान्य केले

नवी मुंबईत शिवसेनेकडून 57 जागांची मागणी करण्यात आली होती. परंतु आम्ही त्यांना 20 ते 22 जागा देण्यास तयार होतो. अखेर त्यांनी एबी फॉर्म भरले आणि आम्हीही भरले, त्यानंतर जे झालं, ते चांगलंच झालं, ठाण्यातील लोकांना अशी करामत करता आली नाही. ठाण्यात आणि कल्याणमध्येही तसेच झाले. तरी सुद्धा पक्षाला जे मान्य होते तेच आम्ही मान्य केले असं ते म्हणाले.

वनमंत्री गणेश नाईक प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक

नवी मुंबई महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार 5 फेब्रुवारी रोजी महापौर निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली असून या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांची नियुक्ती करण्यात आलेय. याच पाश्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक हे 3 फेब्रुवारी रोजी सर्व नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून या बैठकीत महापौर पदाचे नाव जाहीर करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जातेय. विजयी नगरसेवकांच्या जन आशिर्वाद आणि आभार सोहळ्या दरम्यान वनमंत्री गणेश नाईक यांनी यासंदर्भात सुतोवाच दिलेत.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts