Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • छत्रपती संभाजी नगरमध्ये काशी विश्वनाथ महादेव मंदिरात चोरी
गुन्हा

छत्रपती संभाजी नगरमध्ये काशी विश्वनाथ महादेव मंदिरात चोरी

Kashi Vishwanath Temple Theft

Kashi Vishwanath Temple Theft : छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदनगर येथील काशी विश्वनाथ महादेव मंदिराची दानपेटी चोरांनी मध्यरात्री पळवल्याची घटना समोर आली आहे. चोरटयांनी मंदिराचा कडीकोंड तोडून दानपेटी पळवल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दानपेटी चोरीच्या प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तातडीने चोराला अटक करण्याची मागणी परिसरातील शिवभक्तांनी केली आहे.

महादेव मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याची घटना घडली

मुकुंदवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील रेल्वेगेट नंबर 56 मुकुंदनगर येथील काशी विश्वनाथ महादेव मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. दानपेटीत मोठी रक्कम असल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. गेल्या वर्ष दीड वर्षापासून दानपेटी उघडली नव्हती. त्यामुळे दानपेटीमध्ये मोठी रक्कम असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचाकोपरगावात वाळू माफियांचा उच्छाद; तहसील पथकावर हल्ला, मोबाईल हिसकावला

तातडीने चोरट्यांना अटक करावी अशी मागणी

काशी विश्वनाथ महादेव मंदिर परिसरामध्ये नेहमीच भक्तांची गर्दी असते त्यामुळे दानपेटीत दान येण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. मंदिर परिसरात विविध कार्यक्रम संपन्न होत असतात. फेब्रुवारीमध्येही मंदिराच्या व्यवस्थापन समितीने शिवपुराण कथेचा आयोजन केले. “शिव ते शिव” शिवपुराणकथेचे आयोजन महाशिवरात्रीपासून शिवजयंती पर्यंत करण्यात आले आहे. व्यवस्थापन समिती महाशिव पुराण कथेचे आयोजन करण्याच्या तयारीत असतानाच चोरट्याने मध्यरात्री मंदिराची दानपेटी पळवली. मंदिरातच चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करत आहेत. मुकुंदवाडी पोलिसांनी तातडीने चोरट्यांना अटक करावी अशी मागणी शिवभक्तांनी केली आहे. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना वाढल्याने पोलिसांचा वचक राहिला नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts