Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • कर्ज आणि पैश्यांच्या नियोजनामुळे होताय भांडणं? या 5 गोष्टी असुद्या लक्षात; समजूतदारपणाने टिकवता येईल नातं
लाईफस्टाईल

कर्ज आणि पैश्यांच्या नियोजनामुळे होताय भांडणं? या 5 गोष्टी असुद्या लक्षात; समजूतदारपणाने टिकवता येईल नातं

money issues in relationship

money issues in relationship : आजकाल आपण अत्यंत धावपळीचे जीवन जगतो. का कारण आपण पैसा कमवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो. परंतु पैसा हेच कारण दोन नात्यांमधील तणावाचे कारण देखील ठरते. प्रेम, विश्वास आणि साथ या तिन्ही बाबींवर उभे असलेले नाते एका छोट्या गोष्टीमुळे विस्कटते. ती म्हणजे पैसा. जोपर्यंत हातात पैसे आहे तो पर्यंत माणूस शांत आणि स्वाभिमानी असला तरी जेव्हा पैसे संपतात तेव्हा मात्र तो चिडचिड आणि काटकसरी झाल्याचे बघायला मिळते. खासकरून नवरा बायको असतील तर पैसे का पुरले नाहीत याचा धब्बा एकमेकांवर लावला जातो. आणि मग सुरुवातीला छोटया खर्चावरून होणारे वाद हळूहळू भांडणात रूपांतरित होतात. आणि वाद वाढत जातो. अनेकजण या गोष्टीला नशिबाचा खेळ म्हणतात. पण तो नशिबाचा खेळ नसून सर्व काही आपल्या नियोजनावर आधारित असते.

बऱ्याचदा समजूतदार जोडपे असले तरीही खर्चांवरून वाद होतात. आणि यामुळे गैरसमज आणि दुरावा निर्माण होतो. खर्च, बचत, कर्ज, जबाबदाऱ्या आणि भविष्याची चिंता या सर्वच गोष्टींमुळे नात्यांमध्ये ताणतणाव वाढत जातो. एवढेच नाही तर आर्थिक तणावामुळे नात्यात असलेला विश्वास देखील कमी होऊ शकतो. बऱ्याचदा आर्थिक तणावामुळे जोडपे एकमेकांपासून गोष्टी लपवणे, खर्चाची माहिती सहचारिणीला देणे, कर्जाबद्दल सांगणे, अशा सवयी स्वतःला लावून घेतात. परंतु यामुळे नात्यात संशय निर्माण होतो. आणि संवादाचे रूपांतर भांडणात होते. यामुळे मानसिक ताण वाढतो. बऱ्याचदा नाते तुटण्याच्या टप्प्यावर येऊन थांबते.

प्रतिसादात समजूतदारपणाची भावना महत्वाची

पैशांबद्दल जर नियमित आणि मोकळा संवाद जोडप्यांमध्ये होत असेल तर नातं पूर्णपणे बदलू शकते. तुम्ही तुमच्या साथीदाराला तुम्ही घेतलेले लोन, लोन घेण्यामागील कारण, तुमचे उत्पन्न, तुमच्यावर असलेले कर्ज या आर्थिक विषयावर भाष्य केले तर तुमच्या नात्यात सकारात्मक बदल तुम्हाला घडताना दिसून येऊ शकतो. एकंदरीत काय तर संवाद महत्वाचा. आणि या संवादाला समोरून येणाऱ्या प्रतिसादात जर समजून घेण्याची भावना दडलेली असेल तर संवाद योग्य पद्धतीने होऊ शकतो.

संवादातून आर्थिक नियोजन

नियोजनाबददल किंवा आर्थिक विषयाबददल बोलत असताना होणाऱ्या संवादात आरोपप्रत्यारोप, तक्रार किंवा टोमणे टाळणे महत्वाचे आहे. ‘तूच नेहमी जास्तीचा खर्च करतेकिंवातुला बचतीचे काहीच महत्व नाहीहे वाक्य आपल्या स्वतःचा बचाव करण्यासाठी वापरण्यापेक्षा आपण दोघेही मिळून खर्च कसा कमी करू शकतो ? याला महत्व देणे फायदेशीर ठरू शकते.आणि असा सकारात्मक संवाद झाला तर समोरील व्यक्ती सकारात्मकरित्या तुमचे म्हणणे ऐकून आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने होऊ शकते.

आर्थिक विचारधारा वेगवेगळी

नवरा बायको दोघांचा पैशांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो. दोघांचा स्वभाव सारखा असला तरीही दोघांची पैसे वापरण्याची पद्धत आणि पैशांकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील वेगवेगळा असू शकतो. बऱ्यादा बायको ही अत्यंत काटकसरी असते तर नवरा खर्चिक असतो. किंवा बायको खर्चिक आणि नवरा काटकसरी देखील असू शकतो. परंतु प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धत वेगवेगळी असते. काहीजण बचतीवर भर देतात तर काही जण जगण्यावर. तर कधी जबाबदारीचे ओझे जे एका व्यक्तीवर जास्त असल्याने इच्छा असून जीवन जगणे शक्य होत नाही. यामुळे असंतोष निर्माण होतो. पण महत्वाचं म्हणजे जर जोडप्यांमध्ये स्पष्ट संवाद नसेल तर छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात.

अनावश्यक वाद टाळता येऊ शकतो

संवाद साधने तर महत्वाचे आहे परंतु त्यासोबत मासिक बजेट बनवणे देखील महत्वाचे आहे. आणि मासिक बजेट बनवण्याची सवय तुम्हाला लागली तर योग्य पद्धतीने बजेट बसू शकते. घरखर्च, बिल, कर्जाचे हप्ते, बचत, आणि किरकोळ खर्च या सर्वांसाठी ठराविक रक्कम निश्चित करणे गरजेचे आहे. यामुळे अनावश्यक वाद टाळता येऊ शकतो. आणि यामुळे प्रत्येक महिन्यात आपण करत असलेल्या खर्चावर नजर देखील राहते. आणि अनावश्यक खर्च टाळण्याची वेळ आल्यास तो टाळता येऊ शकतो.

पैशांबद्दल प्रामाणिकपणा ठेवणे अत्यंत महत्वाचे

बऱ्याचदा आपण आपल्या जोडीदारापासून अनेक गोष्टी लपवतो. खासकरून लपवलेले कर्ज किंवा महिन्याचा पगार जोडीदाराला सांगितल्यास मोठ्या वादाचे कारण ठरू शकते. पैशांबद्दल प्रामाणिकपणा ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. आणि यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. यासोबतच हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे कि, पैसे नात्याचा आधार असू शकतो. परंतु आता प्रश्न निर्माण होतो की, पैसे हेच सर्वस्व आहे का ?

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

हळदाची पाने : आयुर्वेदिक गुणांचा अनमोल खजिना हल्लीम (Garden Cress Seeds): आरोग्यासाठी नैसर्गिक सुपरफूड स्नायूंची ताकद वाढवायची? रोज खा हे ७ प्रोटीन सुपरफूड्स! स्ट्रॉबेरी: गोड लाल आरोग्यदायी फळ सुंठ (Dry Ginger): आरोग्याचा खजिना