Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

बीडमध्ये पोलिस भरतीच्या मैदानी चाचणी दरम्यान उमेदवाराचा मृत्यू

Candidate dies during field test

Candidate dies during field test : पोलिस (Maharashtra Police Recruitment) होण्याचे स्वप्न उराशी घेऊन मैदानावर धावत असलेल्या एका उमद्या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडमधून समोर आले आहे. दीपक भास्कर व्हावळ (Deepak Bhaskar Waval candidate) असे या उमेदवार तरुणाचे नाव असून अस्वस्थपणामुळे मृत्यू झाल्याचे कारण सांगितले जात आहे. बीड जिल्हा पोलीस दलात (Beed Police Recruitment) १७४ पदांसाठी ८ हजार १३४ उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी आहेत. आज पहाटेपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झालीय. दुपारच्या सुमारास मैदानी चाचणी (Field test of recruitment process) सुरू असताना या उमेदवाराचा मैदानावरच दुर्दैवी मृत्यू झालाय. अचानक झालेल्या या घटनेनं अनेकांना मात्र जबर धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – शेतकरी आणि कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक; काय सुरु, काय बंद? वाचा सविस्तर

शवविच्छेदनासाठी उमेदवाराचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण कळू शकणार आहे. परंतु अनेक स्वप्न उराशी बाळगून पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त केली जाते. बीड जिल्हा पोलिस दलात रिक्त १७४ पदांसाठी आजपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. 18 तारखेपर्यंत ही प्रक्रिया पार पडणार असून ८ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा पारदर्शी करिता जिल्हा पोलीस दल वरिष्ठ अधिकारी प्रयत्नशील आहेत.

जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान उपलब्ध

या भरती प्रक्रियेदरम्यान कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामध्ये धावण्याच्या चाचणीकरिता फोटो फिनीश हे जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आलेले आहे. याबरोबरच सर्व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि व्हीडीओ चित्रीकरण केले जात आहे. तसेच एखाद्या उमेदवाराने उत्तेजक द्रव घेतले आहे का, हे तपासणी करण्यासाठी रक्त चाचणीही करण्यात येतेय.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts