Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • अजित पवारांच्या मृत्यूनंतर एकनाथ शिंदे झाले सावध; तातडीनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
ताज्या बातम्या

अजित पवारांच्या मृत्यूनंतर एकनाथ शिंदे झाले सावध; तातडीनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Eknath Shinde | अजित पवार (Ajit Pawar) यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात (Ajit Pawar Plane Crash) दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रातून (Maharashtra) हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच अजितदादांच्या मृत्यूनंतर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे दादांचा अपघात होती की घातपात असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच आज सकाळी रोहित पवार हे बारामती पोलीस ठाण्यात VSR कंपनीविरोधात तक्रार करण्यासाठी दाखल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर, आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आणि त्यांच्या शिवसेनेनं (Shivsena) मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – दादांना न्याय मिळालाच पाहिजे…, रोहित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, DGCA विरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल

एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं यापुढे VSR कंपीनीचं विमान न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे आता स्वत: एकनाथ शिंदे, त्यांच्या शिवसेनेचे आमदार, नेते आणि मंत्री VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करणार नाहीयेत. मागील महिन्यात अजित पवारांचा जो अपघाती मृत्यू झाला ते विमान VSR कंपनीचं होतं. तसेच आता DGCA कडूनही VSR च्या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे.

VSR कंपनीवर प्रश्नचिन्ह

काही दिवसांपूर्वीत रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या अपघातातबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेच VSR कंपनीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे अजितदादांचा अपघात होता की घातपात? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, VSR कंपनीच्या मालकाला अटक व्हावी, अशी रोहित पवारांनी मागणी केली आहे. अजित पवारांचा अपघात झाला की घातपात झाला याची माहिती जनतेसमोर आली पाहिजे. मंगळवारी DGCA कडून एक अहवाल आला होता. त्यामध्ये VSR कंपनीतील काही त्रुटी समोर आल्यानंतर DGCA ने या कंपनीची लिअरजेट विमानं उड्डाण करण्यास बंदी आणली होती. पण, त्या अहवालातही या कंपनीला वाचवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करण्यात आला होता. जर VSR कंपनीची चूक असेल तर डीजीसीएचीही चूक आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. VSR कंपनीच्या मालकाला अटक केली पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts