NCP National President Election | अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा (NCP National President Election) राष्ट्रीय अध्यक्ष ठरणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजता वरळी येथील ‘डोम’मध्ये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि आमदारांची महत्त्वाची बैठक बोलण्यात आली आहे. तर याच बैठकीमध्ये नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची धुरा कोणाकडे जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा – विदर्भात काँग्रेसला मोठधक्का; वारजुकर कुटुंबाचा सामूहिक राजीनामा
कोण होणार पक्षाचा अध्यक्ष? अमोल मिटकरींनी केलं स्पष्ट
आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या बैठकीत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची निवड एकमताने होण्याची शक्यता आहे. मिटकरी म्हणाले की, “सुनेत्रा वहिनींना एकमताने पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी आम्ही सर्व आमदार आज वरळीला जात आहोत. याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये आधीच चर्चा झाली असून आज त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब होईल.”
रोहित पवारांबाबत काय म्हणाले मिटकरी
पुढे अमोल मिटकरींना रोहित पवारांसोबत पोलीस ठाण्यात जाणार का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, रोहित पवारांचा आणि माझा राजकीय प्लॅटफॉर्म वेगळा जरी असला तरी हा प्रश्न माझ्या नेत्याच्या अपघाताचा आहे. DGCA आणि VSR कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी मी राहित पवारांसोबत गेलो होतो.
फक्त रोहित पवारच नाहीत तर एमआयएम किंवा काँग्रेसच्या आमदारानेही हा लढा सुरू केला असता तरीही मी त्यांच्यासोबत गेलो असतो. कारण अजित पवारांच्या मृत्यूसाठी DGCA आणि VSR कंपनी जबाबदार आहे, असंही अमोल मिटकरी म्हणाले.












