• Home
  • महाराष्ट्र
  • सुशांतच्या मुद्यावर एवढा गदारोळ केला, मग अजित पवारांचं काय? रोहित पवारांचा संतप्त सवाल
ताज्या बातम्या

सुशांतच्या मुद्यावर एवढा गदारोळ केला, मग अजित पवारांचं काय? रोहित पवारांचा संतप्त सवाल

pawar

Rohit Pawar | अजित पवारांच्या (Ajit Pawar) अपघाती मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून (Maharashtra) हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच अजित पवारांचा खरंच अपघात झाला की घातपात झाला? असा सवालही उपस्थित केला जात आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी तर हा मुद्दा उचलूनच धरला आहे. त्यांनी मागील महिन्यात पत्रकार परिषद घेत काही पुरावे सादर करत दादांचा अपघात आहे की घातपात? अशी शंका उपस्थित केली आहे.

हेही वाचा – घड्याळ कोणाच्या हातात? राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष आज ठरणार; मिटकरींच्या विधानाने खळबळ, म्हणाले, मी रोहित पवारांसोबत…

रोहित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी VSR आणि DGCA या कंपन्यांविरोधात सखोल चौकशीची मागणीही केली आहे. यासाठी ते काल मुंबईतील मरीन ड्राइव्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेले होते. मात्र, तिथे पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यानंतर आज सकाळी रोहित पवार बारामती पोलीस स्थानकात दाखल झाले होते. तिथेही त्यांनी या दोन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पण अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.

सुशांत सिंगच्या मुद्द्यावर काय म्हणाले रोहित पवार?

सुमारे दोन तास पोलीस स्थानकात घालवल्यानंतरही गुन्हा दाखल न केल्याने संतप्त रोहित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधत काही मुद्दे उपस्थित केले. यामध्ये त्यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंग (Sushant Singh Rajput) राजपूतच्या मृत्यूचे उदाहरण देत काही सवाल उपस्थित केले.

रोहित पवार म्हणाले की, काही वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने आत्महत्या केली की त्याचा मृत्यू झाला या मुद्दावरून रान उठवण्यात आलं. चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. मग आता आपले अजित दादा हे तर महाराष्ट्राचे एवढे मोठे नेते आहेत, ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते, मग त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यानंत गुन्हा दाखल का केला जात नाही? दादांना न्याय का मिळत नाही? असा संतप्त सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला. तसेच या इन्व्हेस्टिगेशनवर कोणाचा तरी दबाव असणार त्यामुळेच हा तपास योग्य दिशेने जात नाहीये, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts