• Home
  • महाराष्ट्र
  • अजित पवारांच्या विमान अपघातामागे कुणाचा हात? रोहित पवारांनी थेट नावच सांगितलं, कोण आहे ती व्यक्ती?
Top News

अजित पवारांच्या विमान अपघातामागे कुणाचा हात? रोहित पवारांनी थेट नावच सांगितलं, कोण आहे ती व्यक्ती?

pawar 1

Rohit Pawar | VSR कंपनीच्या मालकाला अटक व्हावी, अशी रोहित पवारांनी (Rohit Pawar) मागणी केली आहे. अजित पवारांचा (Ajit Pawar) अपघात झाला की घातपात झाला याची माहिती जनतेसमोर आली पाहिजे. मंगळवारी DGCA कडून एक अहवाल आला होता. त्यामध्ये VSR कंपनीतील काही त्रुटी समोर आल्यानंतर DGCA ने या कंपनीची लिअरजेट विमानं उड्डाण करण्यास बंदी आणली होती. पण, त्या अहवालातही या कंपनीला वाचवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करण्यात आला होता. जर VSR कंपनीची चूक असेल तर डीजीसीएचीही चूक आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. VSR कंपनीच्या मालकाला अटक केली पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांनी केलेल्या या मागणीनंतर ते आज (26 फेब्रुवारी) सकाळी बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, अद्यापही बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाहीये. सुमारे दोन तास पोलीस स्थानकात घालवल्यानंतरही गुन्हा दाखल न केल्याने संतप्त रोहित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधत काही मुद्दे उपस्थित केले.

हेही वाचा – सुशांतच्या मुद्यावर एवढा गदारोळ केला, मग अजित पवारांचं काय? रोहित पवारांचा संतप्त सवाल

पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघातामागे (Ajit Pawar Plane Crash) कुणाचा हात आहे? यावरून मोठं भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज्यातील एका मोठ्या नेत्याचाही उल्लेख केला. त्यामुळे आता सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

कुणाला तरी वाचवलं जातंय, रोहित पवारांचा संशय

रोहित पवार म्हणाले, अजितदादांना न्याय का मिळत नाही? गुन्हा का दाखल केला जात नाही? जर आम्ही चुकीचा एफआयआर दाखल करत असू तर आमच्यावर थेट कारवाई करा, आम्हाला तुरूंगात टाका. पण ऐकतच नाहीत. नक्कीच कुणाला तरी वाचवलं जात आहे. पोलिसांवर कुणाचंतरी प्रेशर आहे, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे.

अपघातामागे कुणाचा हात? रोहित पवारांनी कोणाचं नाव घेतलं?

VSR कंपनीचे मालक अनेक मोठ्या लोकांच्या जवळचे आहेत. रोहित सिंग याच्या लग्नाला महाराष्ट्रातील मोठा नेता गेला होता. सोबत आंध्राचा नेताही गेला होता. त्याच्याच NBSC कंपनीला रोहित सिंगने मोठा निधी दिला होता. त्यामुळेच त्याला वाचवलं जात आहे, असा थेट आरोप रोहित पवारांनी केला आहे.

दरम्यान, आपले अजित दादा हे तर महाराष्ट्राचे एवढे मोठे नेते आहेत, ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते, मग त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यानंत गुन्हा दाखल का केला जात नाही? दादांना न्याय का मिळत नाही? असा संतप्त सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला. तसेच या इन्व्हेस्टिगेशनवर कोणाचा तरी दबाव असणार त्यामुळेच हा तपास योग्य दिशेने जात नाहीये, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts