Breaking News :
ताज्या बातम्या

बारामती विमानतळावर पुन्हा अपघात; लँडिंगवेळी नेमकं काय घडलं?

Baramati Plane Crash | baramati
Baramati: बारामती विमानतळावर प्रशिक्षण विमानाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

बारामती विमानतळावर (Baramati Airport) आज ०९ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास पुन्हा एकदा प्रशिक्षण (Training Aircraft) विमानाला अपघात (Baramati Plane Crash)  झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लँडिंग करत असताना विमान रनवेवरून घसरल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा: रायगडमध्ये राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘तिसरी मुंबई’वर सवाल, म्हणाले- ‘जमिनी विकू नका’

या घटनेनंतर विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, बारामतीत यापूर्वीही विमान अपघातांच्या घटना घडल्या आहेत. Aircraft News

२८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार यांचं विमान कोसळून दुर्घटना झाली होती. त्यानंतर मे महिन्यात प्रशिक्षण विमानाचा अपघात झाला होता. त्यामुळे बारामतीतील विमान सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

या घटनेनंतर विमानतळ परिसरात खळबळ उडाली असून, अपघातात नेमके किती जण जखमी झाले आहेत, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

सुनेत्रा पवार यांनी फोनवरून घेतली दुर्घटनेची माहिती

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फोनवरून घेतली आहे. त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात असून, अपघाताची परिस्थिती आणि बचावकार्याबाबत माहिती घेत आहेत. विमान अपघाताचं नेमकं कारण काय, तसेच विमानातील प्रवासी किंवा प्रशिक्षणार्थींची स्थिती काय आहे, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts