Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • अजित पवार यांचा अपघात नाही तर 100 टक्के घातपात, राज्यातील मोठ्या नेत्याचे वक्तव्य
Top News

अजित पवार यांचा अपघात नाही तर 100 टक्के घातपात, राज्यातील मोठ्या नेत्याचे वक्तव्य

Ajit Pawar dies

Ajit Pawar dies : काल राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा DGCA कडून प्रथम अहवाल सादर करण्यात आला असून यामध्ये अपघाताची कारणे स्पष्ट करण्यात आले आहेत. यातील काही करणांमुळे काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केलं आहे. हेच नाही तर अजित पवार यांचा 100 टक्के घातपात करण्यात आल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की, या अहवालात सांगितले की, विमान एका झाडाला धडकले आणि खाली कोसळले. अशी तकलादू थेरी देत असतील तर स्पष्ट होते की, अजित पवार यांचा अपघात नाही तर 100 टक्के घातपात आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

विमान अपघाती मृत्यूला काल एक महिना पूर्ण

अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूला काल एक महिना पूर्ण झाला. या महिन्याभरात अनेकांच्या मनात घातपाताचे काहूर माजले होते. आमदार रोहित पवार यांनी तर अनेक पत्रकार परिषदा घेऊन हा कसा घातपात आहे, याचे कागदोपत्री पुरावे दिले. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक संशय व्यक्त केली जात असतानाच काल अहवाल पुढे आला. अजित पवार यांच्या विमान अपघाताची काही कारणे स्पष्टपणे देण्यात आली. यासोबतच अहवालात सर्वात महत्वाचे स्पष्ट करण्यात आले की, पायलटची शेवटी शब्द नक्की काय होती.

एकही व्यक्ती या अपघातात जिवंत राहू शकली नाही

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाची भीषण अपघात झाला. विमानातील एकही व्यक्ती या अपघातात जिवंत राहू शकली नाही. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. सकाळी 8 वाजून 45 मिनिटाला अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघाताचे काही व्हिडीओ देखील पुढे ज्यामध्ये अजित पवार यांचे विमान एका बाजूला झुकताना स्पष्टपणे दिसत होते. रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर संशय व्यक्त करण्यात आला. रोहित पवार यांनी थेट एफआयआर दाखल करण्यासाठी प्रयत्न केली पण एफआयआर दाखल होऊ शकली नाही. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

22 पानांच्या या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

सुनेत्रा पवार यांनी फक्त उपमुख्यमंत्रिपदाची शपथच नाही तर पक्षाची धुराही आपल्या हाती घेतली. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर एका महिन्याने आता या अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा याबाबत माहिती देण्यात आली आहे. 22 पानांच्या या अहवालातून धक्कादायक माहितीही समोर आली आहे. विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी ते एका झाडावर कोसळले असल्याचे अहवालात स्पष्ट सांगण्यात आले.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts