Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • निकृष्ट रस्त्याविरोधात महाबळेश्वर–पाचगणी बंद; पर्यटनावर परिणाम
ताज्या बातम्या

निकृष्ट रस्त्याविरोधात महाबळेश्वर–पाचगणी बंद; पर्यटनावर परिणाम

Mahabaleshwar-Panchagani closed
83

Mahabaleshwar-Panchagani closed : सातारा जिल्ह्यातील सुरूर–वाई–पाचगणी–महाबळेश्वर–पोलादपूर या मार्गावरील रस्त्याचे काम मागील दीड वर्षांपासून संथ गतीने सुरू असून त्याची गुणवत्ता निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी आज महाबळेश्वर आणि पाचगणी येथे बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला नागरिक व व्यावसायिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा – अकोला आणि अमरावती जिल्ह्यात तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार

महाबळेश्वर आणि पाचगणी येथील ग्रामस्थांच्या बैठकीत हा बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सकाळपासूनच दोन्ही पर्यटनस्थळांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक दुकाने, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापने बंद ठेवण्यात आल्याने शहरातील व्यवहार ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

रस्त्याच्या निकृष्ट दर्जामुळे स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी

सुरूर–वाई–पाचगणी–महाबळेश्वर–पोलादपूर या मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून वाहतुकीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील दीड वर्षांपासून सुरू असलेल्या कामाच्या संथ गतीमुळे आणि निकृष्ट दर्जामुळे स्थानिक नागरिक तसेच पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात पर्यटकांची वर्दळ अत्यल्प

दरम्यान, शनिवार व रविवारच्या दिवशी महाबळेश्वर येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र आज बंदच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात पर्यटकांची वर्दळ अत्यल्प असल्याचे दिसून आले. पर्यटन व्यवसायावरही याचा मोठा परिणाम झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने आणि वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts