Latest Government Job Opportunities March 2026: जर तुम्ही दहावी पास आहे आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. मार्च २०२६ मध्ये रेल्वे, बँकिंग, संरक्षण आणि इतर सरकारी विभागांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
आजच्या काळात सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहत असतात. स्थिर करिअर, चांगला पगार आणि विविध सुविधा यामुळे सरकारी नोकऱ्यांकडे उमेदवारांचा विशेष कल असतो. दरम्यान, मार्च २०२६ महिन्यात दहावी, बारावी आणि पदवीधर उमेदवारांसाठी विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे.
रेल्वे, बँकिंग, संरक्षण आणि इतर सरकारी विभागांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी या भरतीबाबतची माहिती जाणून घेऊन वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या विभागात भरती जाहीर झाली आहे.
रेल्वे भरती
रेल्वे विभागामार्फत अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेले असणे आवश्यक आहे.
पद: अप्रेंटिस
पात्रता: 10वी किंवा ITI
वय मर्यादा: 15 ते 24 वर्षे
निवड प्रक्रिया: मेरिटच्या आधारावर
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 23 मार्च 2026
RBI भरती
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट पदासाठी भरतीची संधी उपलब्ध झाली आहे.
पद: असिस्टंट
पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
वय मर्यादा: 20 ते 28 वर्षे
निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 08 मार्च 2026
हेही वाचा: India Post GDS 2026 Result: इंडिया पोस्ट GDS 2026 चा निकाल जाहीर; ‘या’ संकेतस्थळावर पाहा रिजल्ट
DSSSB भरती
दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (DSSSB) मार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
पद: ASO / JE / AE
पात्रता: पदवी
वय मर्यादा: 18 ते 35 वर्षे
निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 25 मार्च 2026
आर्मी अग्निवीर भरती
भारतीय सैन्यात अग्निवीर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही मोठी संधी मानली जाते.
पद: अग्निवीर
पात्रता: 8वी / 10वी / 12वी उत्तीर्ण
वय मर्यादा: 17.5 ते 21 वर्षे
निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 01 एप्रिल 2026
अंगणवाडी भरती
महिला उमेदवारांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
पद: सेविका / मदतनीस
पात्रता: 12वी उत्तीर्ण
वय मर्यादा: 18 ते 35 वर्षे
निवड प्रक्रिया: मेरिटच्या आधारावर
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 09 मार्च 2026












