Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • जर व्ही.के.सिंगला ताब्यात घेतलं तर काही लोकांची…, अजित पवार अपघात प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक, केला मोठा गौप्यस्फोट
Top News

जर व्ही.के.सिंगला ताब्यात घेतलं तर काही लोकांची…, अजित पवार अपघात प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक, केला मोठा गौप्यस्फोट

rohit pawar 3

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash | राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा खरंच अपघात आहे की घातपात आहे? असा सवाल सध्या निर्माण होताना दिसत आहे. कारण अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत (Ajit Pawar Plane Crash) दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक संशय निर्माण केले जात आहेत. तसेच मागच्या महिन्यापासून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दोनदा पत्रकार परिषद घेत या अपघात प्रकरणाशी निगडीत काही पुरावे सादर करत संशय व्यक्त केला आहे. तसेच आताही या प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक झाले असून त्यांनी व्हीएसआर (VSR) कंपनीच्या मालकावर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा – VSR च्या मालकाकडून पिंकी माळी यांच्या भावाला धमकी; अमोल मिटकरींचा धक्कादायक खुलासा, म्हणाले, अंडरवर्ल्डशी संबंध…

मागील काही दिवसांपासून रोहित पवार हे देशातील अनेक नेत्यांची भेट घेत आहेत. तर आज त्यांनी सपा अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकावर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांनी VSR कंपनी आणि VSR कंपनीचे मालक व्ही.के.सिंगवर (V.K.Singh) गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांच्या विमान अपघातादरम्यान दाट धुकं असल्यामुळे व्हिजीबिलीटी कमी होती. त्यावेळी विमानाचे कॅप्टन कपूर यांनी व्ही.के.सिंगशी संवाद साधत त्यांना व्हिजीबिलीटी खराब असून आम्ही आत्ता टेक ऑफ करू शकत नाही, अशी माहिती दिली. पण, तेव्हा व्ही.के.सिंगने कपूर यांना म्हटलं की, तू टेकऑफ कर, बाकीचं काय ते मी नंतर पाहीन, असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे.

आत्ता मी जे काही बोलत आहे त्याचा पुरावा म्हणजे व्ही.के.सिंगचे सीडीआर काढून त्यातील संभाषण तपासता येऊ शकतं. अपघाता दिवशी कपूर यांच्या रक्तामध्ये कुठेही दारू, ड्रग्स आढळले नाही. मग दारू न पितासुद्धा त्याने जे काही केलं ते का केलं असेल? यासाठी खोलात जाऊन तपास करावा लागेल. कारण कपूरवर काही दबाव होता का? तसेच व्ही.के.सिंगला वाचवलं जात आहे का? असा सवाल सध्या निर्माण होत आहे, असंही रोहित पवार म्हणाले.

व्ही.के.सिंगला वाचवलं जात आहे, रोहित पवारांचा दावा

पुढे ते म्हणाले, जेव्हा अजितदादा विमानात होते तेव्हा ते विमान पडलं की पाडण्यात आलं? हा माझा प्रश्न असून त्याची उत्तरं मला हवी आहेत. बाकी व्ही.के.सिंग आणि VSR कंपनीशी मला घेणं देणं नाही, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच जर व्ही.के.सिंगला ताब्यात घेतलं तर तो काही लोकांची नावं समोर आणू शकतो, त्यामुळे व्ही.के.सिंगला आणि VSR कंपनीला वाचवलं जात आहे, असा दावाही रोहित पवारांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts