Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • लाडक्या बहि‍णींसाठी मोठी बातमी; फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र मिळणार? 3000 रुपये खात्यात जमा होणार?
Top News

लाडक्या बहि‍णींसाठी मोठी बातमी; फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र मिळणार? 3000 रुपये खात्यात जमा होणार?

Ladki Bahin Yojana | राज्यातील लाडक्या बहि‍णींसाठी (Ladki Bahin Yojana) मोठी बातमी समोर आली आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता अजूनही जमा झालेला नाहीये. त्यामुळे मार्च महिना सुरू झाला तरी देखील खात्यात पैसे जमा का नाही झाले? असा प्रश्न अनेक बहि‍णींच्या मनात निर्माण झालेला आहे. पण आता लाडक्या बहि‍णींना चिंता करण्याची गरज नाहीये. कारण फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यातील पैसे एकत्र मिळणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे.

हेही वाचा – Dating App Safety: डेटिंग अँप वापरताय? सावध! हे फक्त प्रेम नाही, फसवणूकही होऊ शकते; वाचा सुरक्षिततेसाठी ‘या’ टिप्स

लाडक्या बहिणींना दोन महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार?

लाडक्या बहि‍णींना आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न आल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण असून पैसे खात्यात कधी येणार याची उत्कंठा महिलांना लागलेली दिसत आहे.

मागील काही महिन्यांपासून लाडकी बहिण योजनेचा हफ्ता महिलांच्या खात्यात वेळेवर जमा होत नसल्याचं दिसून येत आहे. यामध्ये आता फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता जवळपास दीड महिना लांबणीवर गेल्यामुळे पैसे खात्यात कधी जमा होणार? असा सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहे. तर काही दिवसांपासून गेल्या महिन्याचा हप्ता हा पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिला जात आहे. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ताही मार्चच्या शेवटच्या आठवड्यात मिळणार असल्याची शक्यता आहे.

3000 रूपये खात्यात जमा होणार?

महिलांना गेल्या काही महिन्यांपासून दोन महिन्याचे हप्ते एकत्र दिले जात होते. त्यामुळे आताही फेब्रुवारी-मार्चचा हफ्ता एकत्र मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे आता महिलांच्या खात्यात 3000 रूपये जमा होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारने लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. जर कोणी ई-केवायसी केली नाही तर त्यांच्या खात्यात हप्ता जमा होणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. तर ज्या महिलांच्या ई-केवायसीमध्ये दुरूस्ती आहे त्यांना सरकारने दुरूस्ती करण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. सरकारने 31 मार्चपर्यंत महिलांना ई-केवायसीमधील दुरूस्ती करण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे.

दरम्यान, काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. तसेच आता राज्य सरकार लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती सुनेत्रा पवारांनी दिली.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts