New e-KYC hurdle : एकानाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारने लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Scheme) चालू केली अन् २०२४ च्या विधानसभेत (2024 Legislative Assembly) ना भूतो ना भविष्य असं बहुमत मिळवलं. मात्र, निवडणूका झाल्यानंतर हे सरकार लाडीक बहिण योजना बंद करेल, आरोप करण्यात येत होता. मात्र, गेली दोन वर्षा ही योजना चांगल्या पद्धतीने चालू होती. मागील काही दिवसांत सरकारने ई-केवायसीचा (e-KYC) नवा घाट घातला अन् आता लाडक्या बहिणींना हप्त्यांसाठी वाट पाहावी लागत आहे. २०२४ च्या विधानसभेत लाडकी बहिण योजनेमुळेच विरोधकांचा निवडणुकीत पार धुरळा उडाला आणि महायुती सरकारचाच बोलबाला झाला. इतरांचंच काय स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) स्वतः निवडणुका जिंकल्यानंतर हे म्हटलं होतं की हा विजय लाडक्या बहिणींचा विजय आहे.
हेही वाचा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले
गरज सरो अन् वैद्य मरो अशी स्थिती निर्माण
मात्र आता सगळ्याच निवडणुका संपल्या आहेत, त्यामुळे गरज सरो अन् वैद्य मरो अशी स्थिती निर्माण झाल्याचं बोललं जातंय. आता पुढची 5 वर्ष राज्यात कोणत्याही पक्षाला ना मतांची गरज आहे ना लोकांची ना कार्यकर्त्यांची. मग अशा लाडक्या बहिणींनो तुमचीही गरज पुर्ण झाल्यात जमा असल्याचं दिसून येतंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया ३० एप्रिलला पूर्ण झाली आहे. अपात्र लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळल्यानंतर आता लाभार्थी महिलांची संख्या १ कोटी ८० लाखांवर पोहोचल्याचं कळतंय. हि संख्या आणखी कमी करण्याचं राज्य सरकारचा प्रयत्न आहे कारण लाडकी बहिण योजनेमुळे सरकारी तिजोरीत जो खडखडाड निर्माण झालाय त्यानं सरकारचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
इतर निधी लाडकी बहिण योजनेसाठी वळवला
महिला व बाल विकास खात्यातून या योजनेसाठी निधी देण्याचं नियोजित असलं तरी निधीची कमतरता झाल्यावर ईतर खात्यांच्या निधीवर डल्ला मारला जातो. खास करू सामाजिक न्याय विभागाचा निधी अनेकदा लाडकी बहिण योजनेसाठी वळवला गेलाय ज्यावरून सरकारमध्ये अंतर्गत वादंगही झालाय. आता राज्य सरकारनं हे स्पष्ट केलंय की ई-केवायसी पूर्ण होईपर्यंत मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत.
पात्र महिलांचा आकडा कमी करण्याचा मानस
ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. कारण यामुळे पात्र महिलांचा आकडा आणखी कमी करण्याचा सरकारचा मानस आहे. पण हि ईकेवायसी प्रक्रिया पुर्ण होऊन ही आठवड्याचा कालावधी उलटून गेलाय मात्र अद्यापही लाडक्या बहिणींना पैसे खात्यात मिळालेले नाही. पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे एकत्र 3 हजार येणार का? अशी चर्चा आता जोरात सुरू आहे मात्र मे महिना उजाडूनही हे पैसे न मिळाल्यानं आता फक्त ईकेवायसी प्रक्रियेच्या नावाखाली हप्ते रखडवण्याची चाल ढकल सुरू असल्याचा आरोप विरोधक सरकारवर करतायत. त्यातच सगळ्या निवडणुकाही संपल्यांमुळे आता लाडकी बहिण योजनेचे हप्ते कायमचेच रखडले जाणार अशी शक्यता वर्तवली जातेय.












