Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

आधी शाईफेक आता ‘दुग्धाभिषेक’!

Vikas lawande

Vikas lawande : राष्ट्रवादी पक्ष (श.प) गटाचे नेते विकास लवांडे यांच्यावर आज सकाळी वेतोबाची आळंदी येथे शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली. ह. भ. प.संग्राम भंडारे यांनी ही शाईफेक केली . या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा विडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी विकास लवांडे यांनी आपल्या वक्तव्यात वारकरी संप्रदायातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना ‘घुसखोर’ असे संबोधल्याने वारकरी समुदायात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. त्या वक्तव्याविरोधात विविध स्तरांतून निषेध सुरू असून, त्याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर विकास लवांडे यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर दुग्धाभिषेक करत समर्थन दर्शवले. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “आमच्या गुरुवर्यांना परत काही बोललास तर याद राख”, अशी धमकी देखील संग्राम जगताप यांनी दिली आहे.

ह. भ. प संग्राम भंडारी याना अटक करण्याची मागणी

या प्रकरणावरऔन राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. राष्ट्रवादी पक्ष (श प) गटाचे आमदार रोहित पवार या प्रकरणाबाबत कार्यवाही करून ह. भ. प संग्राम भंडारी याना अटक करण्याची मागणी केली आहे. “संध्याकाळपर्यंत त्यांना अटक झाली नाही तर मी पोलीस स्टेशन मध्ये दाखल होतो”, असे रोहित पवार म्हणाले. तसेच संग्राम जगताप यांनी ह. भ. प संग्राम भंडारी यांची पाठराखण करत जे केले ते योग्य केले असे देखील वक्तवाय केले आहे. या बाबतीत चांगलीच राजकीय खळबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच जो पर्यंत ह. भ. प संग्राम भंडारी याना अटक होत नाही तोपर्यंत सत्याग्रह करेल असा निर्णय विकास लवांडे यांनी घेतला आहे.

या सगळ्या प्रकरणानंतर वारकरी संप्रदाय व गृहमंत्री याबाबतीत काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts