• Home
  • महाराष्ट्र
  • धक्कादायक! लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलेसोबत मोठा गैरप्रकार, सत्य ऐकून बसेल धक्का
Top News

धक्कादायक! लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलेसोबत मोठा गैरप्रकार, सत्य ऐकून बसेल धक्का

ladki bahin yojana 2

Ladki Bahin Yojana | राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी ‘लाडकी बहिण योजना’ (Ladki Bahin Yojana) सुरू केली आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलांना मोठा आधार मिळाला आहे. तर या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या खात्यावर दरमहिना 1500 रूपये राज्य सरकार जमा करते. आज कोट्यावधी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, आता या योजनेचा फायदा घेत अनेक गैरप्रकार होत असल्याचं उघडकीस आलं आहे.

हेही वाचा – आशा भोसले यांच्या तब्येतीबाबत कुटुंबीयांनी दिली महत्त्वाची माहिती, सध्या कशी आहे प्रकृती?

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलेसोबत गैरप्रकार

सरकारने काढलेल्या नवीन नियमावलीनुसार लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक महिलेला ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे बऱ्याच महिलांनी ई-केवायसी केली आहे. मात्र काही महिलांनी अद्याप ई-केवायसी केली नसल्यामुळे त्यांना मिळणारा लाभ सरकारने तात्पुरता बंद केला आहे. तसेच ज्या महिला लाभार्थींच्या यादीच बसत नाहीत त्या महिलांना देखील या योजनेतून वगळण्यात आलं आहे. तर ज्यांनी अजूनही ई-केवायसी केलेली नाही त्यांच्यासाठी सरकारने 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. पण, ई-केवायसीची ही प्रक्रिया करताना अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर याच गोष्टीचा फायदा काही नराधमांनी घेतला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नेमकं घडलं काय?

ई-केवायसीच्या नावाखाली एका महिलेसोबत मोठा गैरप्रकार घडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, जळगावमध्ये ई-केवायसी करून देतो असं सांगत एका महिलेकडे एका नराधमाने शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आणखी एका महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणी केल्याचंही समोर आलं आहे. या आरोपीने अशी मागणी करताच पीडित महिलेला मोठा धक्का बसला आणि तिने तातडीने पोलीस स्टेशन गाठले आणि सर्व माहिती पोलिसांनी दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोप रमेश चव्हाणविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी रमेश चव्हाण हा लाडकी बहीण योजनेशी निगडीत ई-केवायसी करण्याचे काम करतो. तर आरोप चव्हाण हा ई-केवायसीची कागदपत्रे घेण्यासाठी पीडित महिलेच्या घरी गेला. तिथे त्याने तिच्याकडून कागदपत्रे घेतली. त्यानंतर ई-केवायसीचे काम करून देण्याच्या बदल्यात त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली, अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे. तर आरोपी चव्हाणने आणखी एका महिलेसोबत गैरवर्तन केले आहे. निवृती वेतन पुन्हा सुरू करून देतो मात्र बदल्यात प्रेमसंबंध ठेवायला लागतील अशी मागणी चव्हाणने पीडितेला केली होती.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी चव्हाणवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. या घटनेनं राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts