Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Hospital Fire: कटक एससीबी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग; १० रुग्णांचा मृत्यू
Top News

Hospital Fire: कटक एससीबी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये भीषण आग; १० रुग्णांचा मृत्यू

Hospital Fire

Odisha ICU fire tragedy: ओरिसा राज्य सरकारच्या कटक एससीबी मेडिकल रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आज पहाटे २.३० ते ३ च्या दरम्यान आग लागली.या आगीत १० रुग्णांचा मृत्यू झालाय.

ओरिसा राज्य सरकारच्या कटक एससीबी मेडिकल रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आज पहाटे २.३० ते ३ च्या दरम्यान आग लागली.या आगीत १० रुग्णांचा मृत्यू झालाय. तर ११ कर्मचारीही या आगीत जखमी झाले. या आगी प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी केलीय. दरम्यान रुग्णांना सुरक्षितस्थळी हलवताना रुग्णालयातील ११ कर्मचारीही भाजले. तर ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: Teacher Update: मोठी बातमी! शिक्षकांना TET पासची अनिवार्यता हटवण्याची मागणी, थेट संसदेत चर्चा, वाचा काय झाले

या प्रकरणाची चौकशी

२३ रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. त्यावेळी आग लागली. या आगीत ७ रुग्ण मृत्युमुखी पडले तर इतर तीन जणांना बाहेर काढताना त्यांचा मृत्यू झाला. अग्निशमन सेवेच्या महासंचालकांना या प्रकरणाची चौकशी करून तात्काळ अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालयीन चौकशीनंतर आलेल्या अहवालानंतर जर या घटनेत कोणी दोषी आढळले तर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

दरम्यान अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली आगीवर नियंत्रण मिळवले. मुख्यमंत्री मांझी यांच्यासहित आरोग्यमंत्री मुकेश महालिंग यांनीही रुग्णालयाला भेट दिली य परिस्थितीचा आढावा घेतला. तर जखमी रुग्णांवर योग्य ते उपचार करावे असे आदेश आरोग्यमंत्री मुकेश महालिंग यांनी दिलेत.तर मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.या आगीत जे ११ कर्मचारी भाजले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये उपचार सुरु आहेत.

विरोधी पक्षनेत्याकडून शोक

या आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांप्रती विरोधी पक्षनेते नवीन पटनायक यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. तर जखमी रुग्णांनी लवकरात लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.आपण लवकरच रुग्णालयाला भेट देऊ असेही त्यांनी सांगितले.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts