• Home
  • शैक्षणिक बातम्या
  • दिल्ली हादरली! पालममधील इमारतीला भीषण आग; 9 जणांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य सुरू
Top News

दिल्ली हादरली! पालममधील इमारतीला भीषण आग; 9 जणांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य सुरू

delhi building fire

Delhi Building Fire | दिल्लीमध्ये (Delhi) एक भीषण घटना घडली आहे. आज (18 मार्च) सकाळी दिल्लीतील पालम (Palam) भागातील एका इमारतीला भीषण (Fire) आग लागली होती. या आगीत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक लोक या घटनेत जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – महिलांवर अत्याचार अन् बलात्कार; एकनाथ शिंदेंचं भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषी अशोक खरातला ठोकल्या बेड्या; पोलिसांना सापडले 58 व्हिडीओ

पालममधील इमारतीला भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पालम भागातील एका चार मजली इमारतीला भीषण आग लागली. सुरूवातीला या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका कॉस्मेटिकच्या दुकानाला भीषण आग लागली होती. ही आग एवढी मोठी होती की ती वाऱ्याच्या वेगाने वरच्या मजल्यावर जाऊन पसरली.

जेव्हा इमारतीला आग लागली तेव्हा तेथील घरांमध्ये एकूण 18 लोक होते. तर यातील काही लोकांनी इमारतीवरून उडी मारून आपले प्राण वाचवले. पण इमारतीच्या काही भागाला भीषण आग लागल्यामुळे बाहेर पडण्याचे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे या आगीत काही लोक अडकले होते. तर या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीला आग नेमकी कशामुळे लागली? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाहीये. दिल्ली पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

इमारतीत अनेक लोक अडकले असल्याची शक्यता

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 30 गाड्या दाखल झाल्या असून सध्या बचावकार्य सुरू आहे. तसेच सकाळी 7 वाजल्यापासून इमारतीला लागलेली आग विझवण्याचे काम सुरू आहे. तर या आगीत काही लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर या घटनेनंतर संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली असून तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिल्लीतील या घटनेची दखल मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घेतली आहे. त्यांनी या आगीच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच रेखा गुप्ता यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, पालम येथील इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेबाबत ऐकून खूप दु:ख झाले. या इमारतीत काही लोक अजूनही अडकलेले आहेत. तर दिल्ली अग्निशमन दल, दिल्ली पोलीस आणि प्रशासन बचावकार्य करत आहेत. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करते, असं रेखा गुप्ता यांनी म्हटलं आहे. तर या घटनेनं संपूर्ण दिल्ली हादरली असून एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts