• Home
  • Top News
  • २४ तासांनंतर दिपके, दास, रांका मुक्त! वर्षभराची अट; CJP चं पुढचं पाऊल काय?
देश

२४ तासांनंतर दिपके, दास, रांका मुक्त! वर्षभराची अट; CJP चं पुढचं पाऊल काय?

Abhijeet Dipke Released

Abhijeet Dipke Released : काल दिल्लीच्या विमानतळावर विमानात घुसून दिल्ली पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतलं, ज्यांच्या अटकेने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली… ते कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका अखेर २४ तासांनंतर पोलिसांच्या ताब्यातून मुक्त झाले आहेत…. २४ तासांच्या नंतर या तिघांची जामिनावर सुटका झालीये, आता पुढे काय होणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय…. कारण CJP ने आज पुन्हा आंदोलनाची हाक दिलीये…. गेल्या २४ तासांत काय घडलं ? आणि पुढे काय होणार, दिल्लीत काय घडतंय पाहूयात….

दिल्ली विमानतळावर नेमकं काय घडलं? ( CJP Protest )

1० ऑक्टोबर २०२६.दिल्ली विमानतळ. मुंबईहून आलेलं विमान धावपट्टीवर उतरत होतं. विमानात शेकडो प्रवासी होते, पण दिल्ली पोलिसांचं लक्ष होतं फक्त तीन चेहऱ्यांवर… अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका, हे तिघेही जंतर-मंतरवर देशातील तरुणांच्या हक्कासाठी, व्यवस्थेच्या विरोधात एका शांततापूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी दिल्लीत पाऊल ठेवत होते. पण ते विमानतळाबाहेर येण्यापूर्वीच, पोलिसांनी थेट विमानात प्रवेश केला. कोणत्याही वॉरंटशिवाय, कोणत्याही ठोस कारणाशिवाय या तिघांनाही विमानातूनच ताब्यात घेण्यात आलं. हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न होता की दिल्ली सरकारची भीती? हा प्रश्न विचारला जाऊ लागला कारण जंतर-मंतरवरील आंदोलनापूर्वीच CJP चे पंख छाटण्याचा हा थेट प्रयत्न होता.

सकाळी १०:०० वाजता पोलिसांनी विमानामध्ये प्रवेश करून अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातूनच ताब्यात घेतले.
सकाळी १०:३० वाजता विमानतळावरून बाहेर काढून पोलिसांनी तिघांना वेगेवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं
दुपारी ३:०० वाजता: जंतर-मंतर आंदोलनाला परवानगी नसल्याचे सांगत सार्वजनिक शांतता भंगाच्या शक्यतेवरून पोलिसांनी त्यांच्यावर अधिकृतपणे प्रतिबंधात्मक अटक लागू केली.
आज सकाळी ९:०० वाजता दिल्ली पोलिसांनी तिन्ही नेत्यांना दिल्ली कॅन्ट येथील एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर केले.
आणि १०:०० वाजता तिघांना जामिनावर सोडले,

हेही वाचा : मिशन डायव्हर्टचा आरोप! नवनाथ बन विरुद्ध विवेकानंद पाटील; रामरक्षेच्या आव्हानाने वाद पेटला

जंतर-मंतरवरील आंदोलन पुन्हा होणार का? ( Abhijeet Dipke Released )

आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो… दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तर सोडलंय, मग आता पुढे काय? आंदोलन होणार की थांबणार? CJP ची पुढील रणनीती काय असणार? अजिंक्य शिंदे यांनी दिलेल्या संकेतानुसार, आंदोलन होणारच, मात्र अभिजीत दिपके यांच्या आजींचे निधन झाल्यामुळे सध्या दिपके आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड दुःखात आहेत. CJP आता अधिक मोठ्या तयारीने मैदानात उतरणार आहे. पोलिसांच्या या दडपशाहीमुळे CJP ला देशभरातून मोठी सहानुभूती मिळाली आहे. आता हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित न राहता, महाराष्ट्र, मुंबई आणि देशाच्या इतर भागांतही पसरवण्याची रणनीती अजिंक्य शिंदे आणि कोअर कमिटी आखत आहे. CJP आता न्यायालयीन लढाईचीही तयारी करत आहे. बेकायदेशीरपणे विमानात घुसून प्रवाशांना ताब्यात घेण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? यावर कोर्टात दाद मागितली जाणार आहे.

अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांची २४ तासांनंतर सुटका झालेली आहे, एक वर्ष शांतता भंग न करण्याच्या अट शातींवर जामीन मिळाला आहे, आता पुढे काय होणार आंदोलन होणार कि माघार घेणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts