Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • CJP ची ५ ऑगस्टला दिपकेंच्या घरी महाबैठक! अभिजित दिपके ठरवणार पुढची रणनीती; राजकीय पक्ष की दबाव गट?
Top News

CJP ची ५ ऑगस्टला दिपकेंच्या घरी महाबैठक! अभिजित दिपके ठरवणार पुढची रणनीती; राजकीय पक्ष की दबाव गट?

CJP Mahabaithak 2026

CJP Mahabaithak 2026 : दिल्लीच्या यशस्वी आंदोलनानंतर CJP आपली पुढची रणनीती आखत आहे, ५ ऑगस्टला CJP ची मोठी निर्णायक बैठक होणार असल्याचं अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलंय, कॉकरोच जनता पार्टीची पहिली राष्ट्रीय कोअर कमिटी बैठकीकडे फक्त सोप्या आणि सध्या स्वरूपात पाहता नाही येणार, तर भारताच्या राजकारणातील एका नव्या प्रयोगाचा पाया ठरवण्याची शक्यता आहे, देशातील १५ ते २० प्रमुख कोअर कमिटी सदस्य आणि प्रवक्ते या बैठकीला हजेरी लावणार आहेत. या होणाऱ्या चर्चेत नक्की काय घडणार ? CJP पक्षाची पुढची रणनीती काय असेल ? शिक्षणाच्या मुद्द्यानंतर कोणता मुद्दा आता हातात घेऊ शकते ? या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जनता पार्टीच्या संभाव्यकॉकरोच राजकीय रणनीती काय असू शकते पाहूयात….

दिल्ली आंदोलनानंतर CJP च्या राष्ट्रीय बैठकीला का आहे महत्त्व? ( CJP Mahabaithak 2026 )

कोणत्याही नव्या पक्षाला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी एका मोठ्या जनआंदोलनाची गरज असते. कॉकरोच जनता पार्टीने ती सुरुवात दिल्लीच्या जंतरमंतरवरून केली आहे. शैक्षणिक गोंधळ आणि तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यांना हात घालत CJP ने केंद्र सरकारच्या धोरणांना आव्हान दिले. या आंदोलनामुळे पक्षाला देशभरातील सुशिक्षित आणि नाराज तरुण वर्गाचा पाठिंबा मिळाला. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या या यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला असून, आता फक्त आंदोलन करणारी संघटना कि एक राजकीय पक्ष म्हणून प्रस्थापित करायचा यावर ५ ऑगस्टची बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

आतापर्यंत कॉकरोच जनता पार्टीची ओळख सोशल मीडिया आणि आंदोलनापुरती मर्यादित होती. परंतु, टिकून राहण्यासाठी मजबूत संघटनेची गरज असते. छत्रपती संभाजीनगर येथील बैठकीत अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी होणाऱ्या चर्चेत सर्वात मोठा भर हा संस्थात्मक रचनेवर असेल. आगामी काळात CJP देशातील किमान १५ प्रमुख राज्यांमध्ये आपापल्या कमिट्या जाहीर करू शकतो. प्रत्येक राज्यात स्थानिक पातळीवर नेतृत्व तयार करणे, जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्यकर्ते सुरू करणे आणि गावपातळीपर्यंत CJP चे जाळे पोहोचवणे ही या बैठकीची पहिली रणनीती असू शकते.

हेही वाचा :  महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 लागू; प्रकाश आंबेडकर

राजकीय पक्ष की दबाव गट? महाबैठकीत होणार मोठा निर्णय

केवळ आंदोलन करून व्यवस्था बदलत नाही, तर व्यवस्थेचा भाग व्हावे लागते, हा विचार घेऊन कॉकरोच जनता पार्टी कदाचित निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या या आक्रमक आणि पद्धतशीर पवित्र्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर मोठी आव्हाने उभी ठाकणार आहेत. सध्या देशात आणि राज्यात सत्ताधारी तसेच विरोधक या दोघांबद्दलही मतदारांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये एक प्रकारची उदासीनता आहे. CJP राजकारणात उतरली नाही तर एक मजबूत दबाव गट बनू शकतो, जर तरुण मतदारांचे मन मोठ्या प्रमाणावर CJP च्या विचारधारेकडे वळले, तर पारंपारिक पक्षांचे मतांचे गणित पूर्णपणे बिघडू शकते. जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ विकास, शिक्षण आणि हक्कांवर आधारित राजकारण करण्यास प्रस्थापित पक्षांना भाग पाडणे, हा या बैठकीनंतरच्या रणनीतीचा सर्वात मोठा राजकीय परिणाम असेल.

मात्र दुसरीकडे पाहिलं तर CJP पुन्हा आंदोलनाची भूमिका घेऊ शकते. कारण सरकारने आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचे आश्वासन दिले होते मात्र अजूनही काही प्रमाणात केसेस सुरु आहेत, अभिजित दिपके यांनी स्पष्ट इशारा सुद्धा दिला होता कि, सरकारने शब्द पाळला नाही तर पुन्हा आंदोलन होईल, त्यामुळे CJP पुन्हा आंदोलनाच्या ताराय्रीत असू शकते, दिल्ली पोलिसांनी सुद्धा जंतरमंतर वर मोठी तगडी सुरक्षा केलेली आहे. ८ – ८ फुटांचे BARIKETS जंतरमंतरवर लावण्यात आले आहेत, तसेच CJP अध्यक्ष अभिजित दिपके यांनी सुद्धा सत्ताधारी भाजपवर अनेक आरोप केले आहेत आणि टीका केलेली आहे, त्यामुळे पुढच्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहन महत्वाच ठरेल….

अभिजित दिपके पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार का?

अभिजित दिपके यांच्या म्हणण्यानुसार सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र तरुण जागा झाला आहे, धर्मेंद्र प्रधानांनी मोदींना वाचवण्यासाठी राजीनामा दिला असंही दिपके यांनी म्हटलंय, त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपासून INSTAGRAM STRATEGY  सुरु केली आहे, तरुणाईचे मत हे सर्वच पक्षांसाठी महत्वाचे आहे, आणि विरोधात गेल्यास मोठे राजकीय नुकसान होऊ शकते, हे सत्ताधारी मोदी सरकारला माहिती आहे, तरुणाईची आकडेवारी पहिली तर CJP ला ३ कोटींपेक्षा जास्त तरुण तरुणी जोडले गेले आहेत, प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तरुणाईची आकडेवारी काढली तर २० टक्के मत हे GEN – Z चं आहे आणि हे किरकोळ नाही, सत्ता उलथून टाकायला २० टक्के सुद्धा पुरेशी आहे, त्यामुळे GEN – Z पिढी सध्यातरी मोदी सरकारच्या काही प्रमाणात विरोधात आहेत, आता पुढे काय होणार ? CJP राजकीय पार्टी घोषित करणार कि दबाव गट म्हणून राहणार कि अजून कुठला मोठ्या मुद्य्यावर आंदोलनाची तयारी करणार गे काहीच दिवसात स्पष्ट होईल,

मात्र ५ ऑगस्ट २०२६ ची ही महाबैठक कॉकरोच जनता पार्टीला एका नव्या उंचीवर नेणारी ठरू शकते. बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेत अभिजित दिपके जी घोषणा करतील, ती महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू करणारी ठरेल यात शंका नाही.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts