Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • निसर्गाचा चमत्कार! एकीकडे उष्णतेची लाट, दुसरीकडे विजांचा कडकडाट अन् पाऊस
Top News

निसर्गाचा चमत्कार! एकीकडे उष्णतेची लाट, दुसरीकडे विजांचा कडकडाट अन् पाऊस

Heatwave, thunder, and rain
90

Heatwave and Thunder : सध्या निसर्गाचा मोठा चमत्कार अनुभवायला मिळत आहे. राज्यात एकीकडे उष्टतेची तीव्र लाट असताना दुसरीकडे मात्र विजांचा कडकडाट आणि पाऊस पाहायला मिळत आहे. त्यामुळे म्हणतात ना निसर्ग कोपला मग कोण नाय आपला. त्याप्रमाणे सध्या सर्वकाही घटताना दिसून येत आहे. राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेलाय. बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे आणि उष्ण आहे. किनारपट्टीच्या भागात उकाडा आणि दमटपणा जाणवतोय तर, काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव आहे. पुढील काही दिवस विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिणमध्ये महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडताना दिसत आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल अनुभवायला मिळतोय.

हेही वाचा – राज्यात गारपीटचा यलो अलर्ट; शेतकरी हवालदिल

हवामान विभागाचे खबरदारी घेण्याचे आवाहन

राज्यावर उष्णतेची तीव्र लाट आल्यावर आता वादळी पावसाची, मेघगर्जना आणि गारपिटीची शक्यता निर्माण झालीय. विशेषतः शेतकरी, रस्त्यावर काम करणारे लोक आणि वीज पुरवठ्याशी संबंधित विभागांनी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केलंय… तापमानात वाढ झाल्याने दुपारी उकाडा आणि संध्याकाळी थंडावा जाणवत आहे… त्यामुळे वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं प्रशासनाने म्हटलंय.

उन्हाचा चटका वाढण्याचा हवामान विभागाचा अंदाज

कोकणात उष्ण आणि दमट हवामान जानवतय. तर राज्यातील उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. राज्यातील अनेक जिल्ह्यांतही उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांत आवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय..

कोकण व खान्देशात उष्णतेचा यलो अर्लट जारी

रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आदी जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय…. कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामान आहे… तर पुणे, मुंबई सारख्या भागात तापमानात काहीशी घट झाली असली तरी उन्हाचे चटके कायम आहेत… मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस आणि विजांचा कडकडाट होत आहे..

मराठवाड्यासह इतर भागात वादळी पावसाची शक्यता

छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह इतर जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार आहेत… राज्यभरात हवामान बदलाची झळक दिसत आहे…. पुढील 24 तासांत वाऱ्यांचा वेग अधिक वाढण्याची शक्यता आहे… महाराष्ट्रातील हवामानात अचानक बदल जाणवला असून पुढील 24 ते 48 तासांसाठी धोका वर्तवण्यात आलाय..त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी बाळगण्याचा इशारा हवामानतज्ज्ञांनी दिला आहे.

गारपीठीमुळे आंबा, द्राक्षे, ज्वारी पिकांचे नुकसान

धाराशिव, हिंगोलीमध्ये सायंकाळच्या सुमारास वादळ, विजांचा कडकडाट आणि तुफान गारपीट झाली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.गारांमुळे कैऱ्या गळून पडल्या आणि द्राक्षाच्या घड फुटल्याने मोठं नुकसान झालं. वादळी वाऱ्यामुळे पिकं आडवी झाली … या गारपिटीमुळे आंबा, द्राक्षे आणि ज्वारी यांसारख्या पिकांचं नुकसान झालं.

आरोग्याच्या दृष्टीने शाळेच्या वेळेसंदर्भात आदेश

उन्हाच्या तडाख्यापासून बवाच आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेच्या वेळेसंदर्भात आदेश काढले आहेत… उष्णतेच्या तीव्र लाटेनंतर हवामानात अचानक बदल होणे, ढगाळ वातावरण, वारा आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे गारपीट, विजा आणि वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे… सर्वसामान्य नागरिकांसाठी, विशेषतः शेतकरी, रस्त्यांवर काम करणारे कर्मचारी आणि विद्युत विभागाचे कामगार यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे… उष्णतेच्या ओसरण्यामुळे काही भागात गहू, हरभरा, ज्वारी आणि फळबागा यांचे नुकसान झालंय… तर काही भागात पावसाने धुमाकुळ घातलाय… त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts