Oat-Zempic Helps in Weight Loss: सध्या सोशल मीडियावर Oatzempic नावाचा नवीन वेट लॉस ट्रेंड जोरात चर्चेत आहे. अनेक लोक दावा करत आहेत की इंजेक्शन सारखं वजन कमी करण्यास मदत करते. पण खरोखर Oat-zempic काय आहे आणि हे आपल्या शरीरावर कसे परिणाम करते? चला आजच्या लेखात जाणून घेऊयात
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वाढलेले वजन हे एक समस्या बनली आहे. हे कमी करण्यासाठी सोशल मीडियावर नवीन डाएट्स, फूड फॉर्म्युला आणि ट्रेंड्स सतत पसरत आहेत. जसे की केटो डाएट, इंटरमिटेंट फास्टिंग इत्यादी. आणखी एक नवीन टेंड म्हणजे ओटझेम्पिक, जो इंस्टाग्राम रिल्समध्ये अनेक लोक फॉलो करताना दिसतात.
हेही वाचा: Dhurandhar 2 Review: पहिल्या भागाची छाया की नवी कहाणी? पाहा कसा आहे ‘धुरंधर 2’
ओटझेम्पिक ट्रेंड काय आहे?
ही डाएट किंवा व्यायामाची पद्धत नाही, तर एक पेय आहे. ते घरी बनवण्यासाठी, मिक्सरच्या भांड्यात ओट्स आणि पाणी ओतून ज्युस बनवा. दूध असल्यास त्यात वनस्पती दूध (plant milk) घालावे. नंतर त्यात अर्धा लिंबाचा रस घालावा. काही लोक चवीनुसार मध, दालचिनी किंवा फळे घालतात.
फक्त हे पेय सकाळी उपासी पोटी किंवा नाश्त्यानंतर प्यायल्यास फायदेशीर मानले जाते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, हे कमी कॅलरी असलेले पेय आहे जे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे ठेवते. सोशल मीडियामुळे वजन कमी होण्यास मदत होते असेही म्हटले जाते. पण खरंच वजन कमी होते का?
ओटझेम्पिकमुळे खरंच वजन कमी होते का?
ओट्समध्ये फायबर, विशेषतः बीटा-ग्लुकन भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते. अनुभवातून असे दिसून आले आहे की ओट्स खाल्ल्याने लोकांना जास्त काळ पोट भरल्यासारखं वाटते, ज्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होते.
विज्ञान काय म्हणते?
क्लिनिकल अभ्यासानुसार, ओट्स आणि फायबर आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. परंतु लिंबूवर्गीय फळे किंवा इतर घटकांसोबत मिसळलेले ओट्स हे ‘जादुई वजन कमी करणारे पेय’ ठरेल, याचा कोणताही सिद्ध पुरावा नाही. मात्र, असे मानले जाते की ओट्समुळे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि फायबरयुक्त आहार रक्तातील साखर व कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. यामुळे भूक कमी होण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.












