Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • स्टार प्लसच्या ‘या’ मालिकांनी जिंकले प्रेक्षकांचे मन; ‘तारक मेहता’ने टॉप-5 मध्ये जोरदार केली एन्ट्री
ताज्या बातम्या

स्टार प्लसच्या ‘या’ मालिकांनी जिंकले प्रेक्षकांचे मन; ‘तारक मेहता’ने टॉप-5 मध्ये जोरदार केली एन्ट्री

TRP

TV TRP 16-22 March 2026: नुकताच या आठ्वड्याची टीव्ही टीआरपी यादी जाहीर झाली असून प्रेक्षकांच्या पसंतीत काही महत्त्वाचे बदल दिसून आले आहेत. काही मालिकांनी आपले वर्चस्व कायम ठेवले असले तरी इतर शोनेही जोरदार कमबॅक करत स्पर्धा अधिक रंगतदार केली आहे.

दार आठ्वड्याप्रमाणे, यावेळी टीव्ही टीआरपी यादी प्रसिद्ध झाली आहे. आणि यावेळी मोठे चढ- उत्तर दिसून आले आहेत. नेहमीप्रमाणे, स्टार प्लसचे दोन्ही शो टॉप २ मध्ये कायम आहेत. पहिल्या स्थानी एकता कपूरची ‘क्योंकी सास भी कभी बहू थी २’ आणि दुसऱ्या स्थानी राजन शाहीची ‘अनुपमा’ आहे.त्यानंतर केवळ मोठा उलटफेर दिसून येतो. बार्क (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल इंडिया) ने टीआरपी यादी जाहीर केली आहे. सर्वच लाडका “तारक मेहता का उल्टा चष्मा” या शोने टॉप ५ मध्ये स्थान मिळवून सर्वाना आश्चर्यचकित केले आहे.

हेही वाचा: आज २२ मार्च! कन्या, मकरसह ‘या’ राशींना करिअरमध्ये प्रगती; अडथळे होतील दूर

क्योंकि सास भी कभी बहू थी 2

स्मृती इराणी आणि अमर उपाध्याय यांच्या मालिकेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. नोइना हिचीची शेवटची इच्छा मिहिरशीशी लग्न करण्याची आहे हे कळल्यावर तुळशी आणि तिच्या कुटुंबाला आश्चर्य वाटते. या शोने २.० टीआरपी मिळवून २.९ वर पोहोचला आहे आणि या आठवड्यात पहिल्या स्थानावर आहे.

अनुपमा (स्टार प्लस)

रूपाली गांगुली यांच्या या शोमध्ये लीप आणि प्रार्थनाच्या मृत्यूनंतर नवा ट्विस्ट आला आहे. कथेत मोठे बदल झाले असून अनुपमाला गोव्यात नवीन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. या शोची टीआरपी 1.9 आणि रीच 3.0 असून हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तुम से तुम तक

शरद केळकर आणि निहारिका चौकसी यांची मालिका ‘तुम से तुम तक’ तिसऱ्या स्थानावर कायम आहे. प्रेक्षकांना आकर्षित ठेवण्यासाठी नवीन ट्विस्ट आणण्याची गरज आहे. या मालिकेचा टीआरपी १.८ आणि रीच २.६ आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’

दीर्घकाळापासून लोकप्रिय असलेल्या या सिटकॉमची प्रेक्षकसंख्या लक्षणीय वाढली असून, ही मालिका टॉप-५ मध्ये चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. सध्याची कथा प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसते. या मालिकेचा टीआरपी १.८ आणि रीच २.९ आहे.

वसुधा

चांगल्या टीआरपीमुळे हा शो टॉप-५ मध्ये आपले स्थान सातत्याने टिकवून आहे. हा या चॅनलवरील एक उच्च रेटिंग असलेला कार्यक्रम बनला आहे. याची टीआरपी १.७ आणि रीच २.४ आहे.

गंगा माई की बेटियां

सरगुन मेहता आणि रवी दुबे झी टीव्हीवर चांगले काम करत आहेत. याचीची टीआरपी १.७ आणि रीच २.७ आहे आणि सहव्या चांगल्या स्थितीत आहे.

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts