Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • अशोक खरातची आर्थिक ‘माया‘ आणि शासकीय अधिकारीही ‘वाया‘?
गुन्हा

अशोक खरातची आर्थिक ‘माया‘ आणि शासकीय अधिकारीही ‘वाया‘?

ashok kahart bhondu

ashok kharat income: नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (ashok kharat) याचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. आता खरातच्या सामायिक सातबारांवर (Joint 7/12 Extract) काही शासकीय अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची नावे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांचे धाबे दणाणले आहेत.

हे ही वाचा: भोंदू अशोक खरात आता आयकरच्या रडारवर

शोध घेण्यासाठी बँक लिंकिंग पद्धतीचा वापर

दरम्यान, खरातला प्रशासकीय स्तरावर कोणाचे संरक्षण होते का? याचीही चौकशी सुरू आहे. खरातच्या आश्रमाला किंवा संस्थांना मोठ्या प्रमाणावर देणग्या देणारे लोक कोण आहेत? त्याच्या आर्थिक व्यवहारात भागीदार कोण होते? याचा शोध घेण्यासाठी बँक लिंकिंग पद्धतीचा (Bank Linking) वापर केला जाणार आहे.

कागदपत्रांची फेरफार करणारा मुख्य एजंट पोलिसांच्या ताब्यात

अशोक खरातसाठी जमिनींचे व्यवहार करणारा आणि कागदपत्रांची फेरफार करणारा मुख्य एजंटला (Chief Agent) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या चौकशीतून खरातने कुठून आणि कोणाकडून जमिनी घेतल्या, याचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. अशोक खरातने कोट्यवधी रुपयांची माया जमवली असली तरी, त्याने कधीही याचे अधिकृत विवरणपत्र (IT Returns) भरले नसल्याचे प्राथमिक तपासात पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता आयकर विभाग त्याच्या उत्पन्नाचे स्रोत, बँक खात्यांमधील मोठे व्यवहार आणि रोख रकमेच्या हालचालींची तपासणी करणार आहे.

‘ते’ तीन IAS अधिकारी कोण?

दरम्यान, खरातला पकडण्याआधी त्याची राज्यतील ‘त्या ’ तीन IAS अधिकाऱयांनी अशोक खरात याची भेट घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ते तीन IAS अधिकारी कोण आहेत याचाही तपास केला जाणार आहे का? प्रशासकीय अधिकारीच खरात याला पाठीशी घालत असतील तर खरोखर न्याय मिळणार आहे का? असाही सवाल केला जात आहे. तर राज्य सरकारनेही त्याच्या शिवनिका संस्थान याला देण्यात आलेले पाणी रद्द केले आहे. त्यामुळे खरात याच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

खरात याच्याकडे किमान १ हजार ५०० कोटींची माया

स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याची SIT कडून चौकशी सुरू आहे. काही मालमत्तांमध्ये अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांचा देखील समावेश असल्याचं बोललं जातंय. खरात यांच्याकडे किमान १ हजार ५०० कोटींची माया असल्याचे बोलले जात आहे. महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू बाबा उर्फ कॅप्टन यांची नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात जमीन आणि काही व्यावसायिक भूखंड आहेत. नाशिक शहर ,पाथर्डी गाव, गौळाने, सिन्नर, शिर्डी, वावी या ठिकाणी देखील मोठी माया या भोंदूबाबाने कमावलेली आहे. त्याचे विविध भागात फार्म हाऊस, ऑफिस, जमीन, व्यावसायिक भूखंड, गाळे, बंगले आहेत. अशोक खरात हा अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशीच आपल्या जागा बघण्यासाठी येत असल्याचं सांगितलं जातंय. खरातने जमीन व्यवहारात अनेकांचे पैसे बुडवल्याची देखील चर्चा आहे. या सर्व मालमत्तेची चौकशी एसआयटी पथकाकडून केली जात आहे. कोट्यावधी रुपयांची मालमत्ता खरातच्या नातेवाईकांसह मुलगी, पत्नी तसच इतर विश्वासू सहकाऱ्यांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts