Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल म्हणजे नेमकं काय? पाहा टॉप कार्स जिथे ‘हा’ फीचर मिळतो
Top News

ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल म्हणजे नेमकं काय? पाहा टॉप कार्स जिथे ‘हा’ फीचर मिळतो

ACC car

Automatic Climate Control: ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल (ACC) तुमच्या कारच्या ACला अटोमॅटिक नियंत्रित ठेवते. आता हे फिचर फक्त १० लाखांच्या खालील काही टॉप्स कार्समध्येही मिळते, ज्यामुळे प्रवास होतो अधिक आरामदायक आणि स्मार्ट.

आजकाल कार्समध्ये फक्त इंजिनच नव्हे तर स्मार्ट फीचर्स देखील महत्वाचे ठरत आहेत. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल (ACC) हे असेच एक फिचर आहे, जे कारच्या अंतर्गत तापमानावर आपोआप नियंत्रण ठेवते. पारंपरिक AC मध्ये तापमान किंवा फॅन स्पीड वारंवार बदलावे लागते, तर ACC मध्ये तुम्ही फक्त हवा तापमान सेट करता आणि बाकी सर्व काही सिस्टम आपोआप करते.

हेही वाचा: रश्मिका– विजय यांचा हनिमूनचा रोमँटिक फोटो आला समोर; पाहताच नेटकरी म्हणाले की…

हे फीचर आता १० लाखांच्या खालील बजेट कार्समध्येही उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायक आणि प्रीमियम अनुभव देतो. चला पाहूया, कोणत्या कार्समध्ये तुम्ही हे फीचर मिळवू शकता.

Tata Altroz

Tata Altroz ही प्रीमियम हॅचबॅक असून XT, XZ आणि वरच्या वेरिएंट्समध्ये ACC मिळतो. याची किंमत साधारण ६.३० लाख – १०.५१ लाख रुपये आहे.

फायदे:

७-इंच टचस्क्रीन
Android Auto आणि Apple CarPlay
ड्युअल एअरबॅग + EBD

Tata Nexon

Tata Nexon ही लोकप्रिय SUV आहे, काही वेरिएंट्समध्ये ACC फीचर उपलब्ध आहे.

फायदे:

मजबूत बॉडी आणि ५-स्टार सेफ्टी
पॉवरफुल इंजिन
आधुनिक फीचर्ससह आरामदायक प्रवास

Maruti Suzuki Baleno

Baleno ही प्रीमियम हॅचबॅक असून Zeta आणि Alpha वेरिएंट्समध्ये ACC मिळतो.
फायदे:

चांगला मायलेज
सोपे मेंटेनन्स
देशभरात मारुती सर्व्हिस नेटवर्क

Hyundai i20

Hyundai i20 उत्कृष्ट इंटीरियर आणि फीचर्ससाठी ओळखली जाते. Sportz आणि Asta वेरिएंट्समध्ये ACC मिळतो. याची किंमत जवळपास ५.९९ लाख – १०.४८ लाख रुपये आहे.

फायदे:

ड्युअल एअरबॅग + EBD
प्रीमियम ड्रायव्हिंग अनुभव
आधुनिक टेक्नॉलॉजी फीचर्स

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts