Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • खुशखबर..! जर्मनीत भारतीयांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
वर्ल्ड

खुशखबर..! जर्मनीत भारतीयांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

germany and india

Golden Opportunity for Indians to Work in Germany : जर्मनीत कुशल कामगारांची (Skilled Worker) संख्या कमी होत आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर कामगार संकट उभे ठाकले आहे. त्यावर मात करण्यासाठी जर्मनी सरकारने (germany government) भारतातील कुशल कामगार यांच्यासाठी सुवर्णसंधी प्राप्त करून दिली आहे. जर्मनी सरकार त्यांना नोकऱ्या देणार आहे. त्यामुळे भारतातील कुशल कामगारांनी याकडे सकारात्मक पाहणे गरजेचे आहे.

हे ही वाचा: जम्मू-काश्मीरच्या बडगाममधले लोक इराणच्या मदतीसाठी पुढे येतात तेव्हा….!

जर्मनी आणि तरुण भारत या दोघांसाठीही हे नाते फायदेशीर

बीबीसीच्या अहवालानुसार, जर्मनीतील विविध क्षेत्रांमध्ये भारतीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे जर्मनीला कामासाठी आवश्यक मनुष्यबळ मिळत आहे, तर दुसरीकडे भारतीयांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. वृद्ध होत असलेला जर्मनी आणि तरुण भारत या दोघांसाठीही हे नाते फायदेशीर ठरत आहे.

जर्मनीत वृद्ध वाढले

जर्मनी सध्या गंभीर लोकसंख्यात्मक संकटाचा सामना करत आहे. देशात तरुणांची संख्या कमी होत असून वृद्धांची संख्या वाढत आहे.

कमी जन्मदर

2024 मधील एका अभ्यासानुसार, जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी सुमारे 2,88,000 परदेशी कामगारांची गरज आहे, कारण देशात कामासाठी पुरेसे तरुण उपलब्ध नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे कमी जन्मदर आहे.

…तर जर्मनीच्या कार्यबलात सुमारे 10 टक्के घट

बर्टेल्समन फाउंडेशनच्या अहवालानुसार, जर जर्मनीने परदेशातून कामगारांना आमंत्रित केले नाही, तर 2040 पर्यंत देशाच्या कार्यबलात सुमारे 10 टक्के घट होऊ शकते.

जर्मनीकडे पुरेसे तरुण नाहीत

अलीकडील काळात निवृत्त झालेल्या लोकांची जागा भरण्यासाठी जर्मनीकडे पुरेसे तरुण नाहीत. त्यामुळे भारतीय कामगार ही कमतरता भरून काढू शकतात.

भारत हा जगातील सर्वात तरुण देश

भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. भारतात 25 वर्षांखालील सुमारे 60 कोटी लोक आहेत.

जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला गती येणार

दरवर्षी केवळ 1.2 कोटी लोक कामगार बाजारात प्रवेश करतात. त्यामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळत नाही. योग्य संधी मिळाल्यास हे तरुण जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला गती देऊ शकतात.

विविध क्षेत्रांचा समावेश

“इंडिया वर्क्स” या उपक्रमांतर्गत यावर्षी 775 भारतीय तरुणांना जर्मनीमध्ये आणण्याची तयारी सुरू आहे, जेथे ते अप्रेंटिसशिप (प्रशिक्षण) सुरू करतील. हे तरुण विविध व्यवसायांमध्ये काम करतील, ज्यामध्ये रस्ते बांधकाम, मेकॅनिक, दगड कोरणारे आणि बेकरी कामगार यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts