Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार! मुंबईत लवकरच म्हाडाची 2500 घरांची लॉटरी; जाणून घ्या संभाव्य किंमत
ताज्या बातम्या

घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार! मुंबईत लवकरच म्हाडाची 2500 घरांची लॉटरी; जाणून घ्या संभाव्य किंमत

Mhada Home scheme

MHADA Lottery Mumbai: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हीही स्वतःचं हक्काचं घर शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता लवकरच तुमचं घराचं स्वप्न साकार होऊ शकतं. कसं ते जाणून घेऊया.

मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांची मोठी संधी येत आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिरकरण (म्हाडा) लवकरच सुमारे २५०० घरांसाठी लॉटरी जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. पुढील १० ते १५ दिवसांत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: हेल्दी आणि पौष्टिक खायचे आहे? सकाळच्या नाश्त्याला बनवा वाफेवरील उपमा गोळे, सोपी आहे रेसिपी

कोणासाठी असतील ही घरं?

या लॉटरीमध्ये विविध उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी घरं उपलब्ध असतील:

EWS (अत्यल्प उत्पन्न गट) – वार्षिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत
LIG (अल्प उत्पन्न गट) – 6 ते 9 लाख
MIG (मध्यम उत्पन्न गट) – 9 ते 12 लाख
HIG (उच्च उत्पन्न गट) – 12 लाखांपेक्षा जास्त

यामुळे प्रत्येक आर्थिक स्तरातील लोकांना घर मिळवण्याची संधी मिळणार आहे.

घरांच्या किमती किती असू शकतात?

अधिकृत दर अद्याप जाहीर झालेले नसले तरी मागील लॉटरीचा विचार केला तर घरांच्या किंमती अंदाजे 30 लाखांपासून ते काही कोटींपर्यंत जाऊ शकतात. लोकेशन, आकार आणि सुविधांनुसार दर वेगवेगळे असतील.

कुठे मिळणार घरं?

मुंबईतील विविध भागांमध्ये ही घरं उपलब्ध होण्याची शक्यता आहे. म्हाडा प्रकल्पांमध्ये सामान्यतः चांगली कनेक्टिव्हिटी आणि मूलभूत सुविधा दिल्या जातात.

अर्जासाठी आवश्यक बाबी

लॉटरीसाठी अर्ज करताना काही महत्त्वाच्या अटी पूर्ण कराव्या लागतात:

अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे
आधार कार्ड / पॅन कार्ड आवश्यक
महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) आवश्यक
मागील काही वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असणे गरजेचे

म्हाडाबद्दल थोडक्यात

1977 मध्ये स्थापन झालेल्या म्हाडाने आतापर्यंत लाखो घरं बांधून सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून दिली आहेत. मुंबईसह पुणे, नाशिक, कोकण आणि संभाजीनगरमध्येही म्हाडाच्या विविध लॉटऱ्या काढल्या जातात.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts