Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • अभिनेत्री सोनाली बेंद्रे अन् तिचा पती अडचणीत; मावळच्या शेतकऱ्याने कोर्टात खेचत केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
Top News

अभिनेत्री सोनाली बेंद्रे अन् तिचा पती अडचणीत; मावळच्या शेतकऱ्याने कोर्टात खेचत केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

Sonali Bendre | बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) ही सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. सोनाली बेंद्रे आणि तिचा पती गोल्डी बेहल (Goldie Behl) यांच्याविरोधात मावळचा शेतकरी उभा राहिला आहे. वडगाव मावळ येथील स्थानकि शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना कोर्टात खेचले आहे. त्यामुळे सध्या सोनाली बेंद्रे आणि तिचा पती अडचणीत सापडले आहेत.

हेही वाचा – खरातनंतर आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश; ‘दोष दूर’ करण्याच्या बहाण्याने महिलांसोबत केला गैरप्रकार

नेमकं प्रकरण काय?

शेतजमिनीच्या वादावरून सोनाली बेंद्रे आणि तिचा पती गोल्डी बेहल अडचणीत सापडले आहेत. शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करत संबंधित जमीन ही वडिलोपार्जित कुळ हक्काची असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे.

1957 पासून ताब्यात असलेल्या 30 गुंठे जमिनीवर आमचा हक्क असताना देखील खोटी कागदपत्रे दाखवत हा हक्क डावलून सोनाली बेंद्रे आणि तिच्या पतीने आमची जमीन विकत घेतल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत शिंदे यांनी केला आहे. सोबतच जमिनीच्या ठिकाणी सोनाली बेंद्रे आणि तिच्या पतीने येऊन दमदाटी केल्याचा आरोपही फिर्यादी शिंदेच्या वकीलांनी केला आहे.

संबंधित जमिनीवर बांधकाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून शिंदे कुटुंबीयांना दमदाटी केल्याचा आरोप सोनाली बेंद्रेवर आणि तिच्या पतीवर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सोनाली बेंद्रेच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. फिर्यादी शेतकरी शिंदे हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि पैसे उकळण्यासाठी सोनाली बेंद्रे आणि तिच्या पतीला बदनाम करण्याचा डाव आखत आहेत, असा आरोप सोनाली बेंद्रेच्या वकिलांनी केला आहे.

या प्रकरणी पोलीस स्थानकात आधीच तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, आता हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्यामुळे न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. तर या प्रकरणाची सुनावणी 20 एप्रिल रोजी होणार आहे. तसेच या प्रकरणाने मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts