Why NASA Still Uses Old Technology in Space Missions: प्रगत तंत्रज्ञानासाठी ओळखली जाणारी अमेरिकेची अंतराळ संस्था नासा (NASA) आजही काही मोहिमांमध्ये जुनी उपकरणे आणि तंत्रज्ञान वापरतात. यामागचे कारण ९९ टक्के लोकांना माहिती नाही.
सध्या नासा आपल्या Artemis 2 मिशांमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ७ एप्रिल रोजी या मोहिमेवरील अंतराळवीरांनी चंद्राभोवती परिक्रमा केली. तब्बल ५३ वर्षानंतर मानव पुन्हा एकदा चंद्राच्या इतक्या जवळ पोहोचला आहे.
हेही वाचा: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? सोने आणि वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या एका क्लिकवर!
याच पार्श्वभूमीवर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, इतकी प्रगत अंतराळ संस्था असूनही नासा जुनीच टेक्नॉलॉजी का वापरते? ऐकायला हे आश्चर्यकारक वाटत असेल तरी यामागचे कारण अत्यंत महत्वाचे आणि रोचक आहे.
Artemis मिशनसाठी जुन्या उपकरणांची निवड
माहितीनुसार, नासाने Artemis सारख्या मोहिमांसाठी आधीच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS)मध्ये वापरले गेलेले उपकरण निवडले आहेत. इतक्या मोठ्या बजेटची आणि अत्याधुनिक संशोधन करणारी संस्था जुनी साधने का वापरते, असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो.
का वापरते जुनी टेक्नॉलॉजी?
नासाचे स्पेसफ्लाइट तज्ज्ञ जेसन हट्ट यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते, यामागे तीन महत्वाचे घटक आहेत.
– कठोर चाचण्या (Testing)
– खर्च (Cost)
– विश्वसनीयता (Reliability)
अंतराळात नेण्यात येणाऱ्या उपकरणांची अत्यंत कठोर आणि दीर्घकाळ चाचणी केली जाते. ही प्रक्रिया अनेक वर्षे चालते आणि त्यासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे एकदा एखादे उपकरण प्रमाणित झाले की, नासा त्याचा अनेक वर्षे वापर करत राहते.
टेक्नॉलॉजी ‘जुनी’ कशी होते?
अंतराळ मोहिमांची योजना अनेक वर्षांपूर्वी आखली जाते. त्या वेळी उपलब्ध असलेले आधुनिक तंत्रज्ञान निवडले जाते. मात्र, प्रत्यक्ष लॉन्चच्या वेळेपर्यंत ते तंत्रज्ञान काही वर्षे जुने झालेले असते.
तरीही नासा नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा धोका घेत नाही, कारण अंतराळ मोहिमांमध्ये चुकांची किंमत खूप मोठी असते. त्यामुळे “नवीन”पेक्षा “विश्वसनीय” पर्याय निवडला जातो.












