Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • अजित पवारांच्या अपघातावरील व्हिडीओ बनवणारा युट्यूबर अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Top News

अजित पवारांच्या अपघातावरील व्हिडीओ बनवणारा युट्यूबर अटकेत, नेमकं प्रकरण काय?

Ajit Pawar Accident Video | राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचा खरंच अपघात होता की घातपात होता? असा सवाल अजूनही निर्माण केला जात आहे. अशातच सोशल मीडियावर अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. आताही एका युट्यूबरने अजित पवारांच्या अपघाताबाबत खळबळजनक दावा केला आहे ज्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

अजित पवारांचा अपघात नसून त्यांची हत्या करण्याचा भाजपचा कट असल्याचा खळबळजनक दावा एक युट्यूबरने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील बुटेगाव येथील उद्धव कापसे या तरूणाचं एक यूट्यूब चॅनेल आहे. ‘UK न्यूज टाईम’ नावाचे त्याचे यूट्यूब चॅनल आहे. तर या चॅनलवर उद्धव कापसेने अजित पवारांच्या विमान अपघातनंतर एक व्हिडीओ प्रसारित केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने दावा केला होता की, अजित पवारांच्या विमानाची सर्व सिस्टिम सुरळीत होती. पण, कोणीतरी विमानाची ‘नेव्हिगेशन सिस्टिम’ हॅक करून ती कंट्रोल करत होतं. त्यामुळे अजित पवारांचा हा अपघात नसून त्यांना संपवण्यासाठी भाजपचा हा एक कट आहे, असा खळबळजनक दावा उद्धव कापसेने केला आहे.

उद्धव कापसेने केलेल्या या दाव्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली आहे. कसल्याही पुराव्याविना केलेल्या दाव्यामुळे भाजपच्या आयटी सेलने उद्धव कापसेविरोधात मुंबई सायबर पोलीस स्थानकार तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून मुंबई सायबर पोलिसांन आरोपी उद्धव कापसेवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. तर न्यायालयाने आरोपी कापसेला 10 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. विमानाची नेव्हिगेशन सिसिस्ट हॅक करण्यासारखी तांत्रिक माहिती आरोपीला कोठून मिळाली, याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. तसेच यापुढे कोणी विनाकारण अफवा पसरवून समाजात तेढ निर्माण केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts