Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • पांढऱ्या केसांना म्हणा बाय-बाय! ‘हे’ तेल वापरायला करा सुरुवात, नैसर्गिकरित्या केस होतील काळे
ताज्या बातम्या

पांढऱ्या केसांना म्हणा बाय-बाय! ‘हे’ तेल वापरायला करा सुरुवात, नैसर्गिकरित्या केस होतील काळे

Grey Hair Solution | आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांचे केस कमी वयातच पांढरे होत (Grey Hair) आहेत. बदलती जीवनशैली, फास्टफूड खाण्याचे जास्त प्रमाण, ताण-तणाव, व्हिटॅमिनची कमतरता अशा अनेक गोष्टींमुळे मोठ्यांसोबत लहान मुलांचे केसही पांढरे होत आहेत. त्यामुळे बहुतेक लोक पांढरे केस काळे करण्यासाठी हेअर डाय वापरतात. मात्र, या डायमध्ये काही असे केमिकल असतात जी केस आणि टाळूला नुकसान पोहोचवतात. पण तुम्हाला माहित आहे का की काही विशिष्ट तेलं लावल्याने तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होऊ शकतात? तर आता आपण काही घरगुती, आयुर्वेदिक तेलांबाबत जाणून घेणार आहोत जे तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी मदत करतील.

हेही वाचा – भोंदूबाबा खरात प्रकरणावर शर्मिला ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, “त्याच्यासोबत असलेल्या महिला…”

पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय कोणते?

आवळा हा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहे. आवळा हा केसांच्या मुळांना काळे करण्यासाठी हा प्रभावी उपाय ठरतो. त्यामुळे खोबरेल तेल आणि वाळलेल्या आवळ्याचे तुकडे लोखंडी कढईत तेल काळे होईपर्यंत उकळा. लोखंडी कढई वापरल्याने तेलातील लोहाचे प्रमाण वाढते, जे केसांसाठी टॉनिक म्हणून काम करते आणि केस काळे करण्यास मदत करते.

मोहरीच्या तेलाने टाळूतील रक्तसंचार वाढण्यास मदत होते. त्यामुळे मोहरीच्या तेलात मेथीचे दाणे घालून ते हलकेच गरम करा आणि हे तेल दररोज केसांच्या मुळाशी लावा. यामुळे केसांचा रंग गडद होण्यास आणि केस दाट होण्यास मदत होते.

कलौंजीमध्ये केसांचा रंग गडद करणारे रंगद्रव्य टिकवून ठेवण्यास मदत करणारे गुणधर्म असतात. तर कलौंजीचे तेल बनवण्यासाठी, एक चमचा कलौंजी खोबरेल तेलात घालून ते तेल काळे होईपर्यंत गरम करा. त्यानंतर, तेल थंड करून केसांना लावा. यामुळे केसातील मेलॅनिनचे उत्पादन वाढते आणि केस काळे होण्यास मदत होते.

कढीपत्ता हा केसांसाठी गुणकारी मानला जातो. कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी असते जे केसांच्या मुळांचे पोषण करते. यासाठी, खोबरेल तेलात मूठभर कढीपत्ता घालून तो काळा होईपर्यंत शिजवा. हे मिश्रण गाळून तयार झालेले तेल आठवड्यातून दोनदा लावा. यामुळे केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध होतो.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts