• Home
  • लाईफस्टाईल
  • उन्हाळ्यात केस होतात ड्राय अन् चिकट; ‘या’ सोप्या टिप्स ठरतील रामबाण
लाईफस्टाईल

उन्हाळ्यात केस होतात ड्राय अन् चिकट; ‘या’ सोप्या टिप्स ठरतील रामबाण

hair care 1

Summer Hair Care Tips | उन्हाळा (Summer) सुरू झाला की प्रत्येकाला केसांच्या अनेक समस्या (Hair Problems) जाणवताना दिसतात. अनेकांचे केस घामाने चिकट होतात, तर काहींचे केस ड्राय पडतात अशा अनेक समस्या निर्माण होताना दिसतात. तर अशावेळी केसांची कशी काळजी घ्यायची असा प्रश्न सर्वांनाच पडतो. पण, टेन्शन घेण्याचं कारण नाही. कारण आता आपण अशा काही सोप्या टीप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्ही अगदी सहजपणे तुमच्या केसांना उन्हापासून वाचवाल आणि केसांची छान काळजी घ्याल.

हेही वाचा – उन्हामुळे त्वचा टॅन झालीये? ‘हे’ घरगुती फेस पॅक नक्की ट्राय करून पहा

1. जेव्हाही तुम्ही कडक उन्हात बाहेर पडता तेव्हा उन्हाची किरणे थेट तुमच्या केसांवर पडतात. यामुळे तुमच्या केसांतील ओलावा कमी होतो आणि केस कोरडे पडतात. त्यामुळे कधीही बाहेर पडताना टोपी घाला किंवा सुती स्कार्फ बांदा. यामुळे तुमचे केस उन्हाच्या किरणांपासून वाचतील आणि कोरडे पडणार नाहीत.

2. उन्हाळ्यामध्ये बरेचजण घाम येतो म्हणून दररोज केस धुतात. पण दररोज केस धुण चुकीचं आहे. केस हे आठवड्यातून 2-3 वेळा धुवा, जेणेकरून घामामुळे कोंडा होणार नाही आणि डोक्यात खाजही सुटणार नाही.

3. उन्हाळ्यात केस धुताना कोमट पाण्याने केस धुवा. काही लोक जास्त गार पाण्याने केस धुतात, त्यामुळे सर्दी होऊ शकते. तर काहीजण जास्त गरम पाणी वापरतात. यामुळे केसांमध्ये घाम जास्त येतो आणि केस तेलकट होता. त्यामुळे केस कोमट पाण्याने धुवा.

4. केसांना ओलावा मिळण्यासाठी घरगुती मास्क तयार करा. यासाठी दही, कोरफड आणि मध घ्या आणि ते मिक्स करून त्याचा मास्क बनवा. तो हेअर मास्क केसांना लावा आणि 15 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा. यामुळे केसांना ओलावा येण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts