Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • युद्धबंदीनंतरही तणाव कायम! इस्रायलचा बेरूतवर भीषण बॉम्बहल्ला; 112 ठार, 800 हून अधिक जखमी
Top News

युद्धबंदीनंतरही तणाव कायम! इस्रायलचा बेरूतवर भीषण बॉम्बहल्ला; 112 ठार, 800 हून अधिक जखमी

Israel Attack On Beirut | दोन दिवसांपूर्वीच अमेरिका (US) आणि इराणने (Iran) समजूतीने करार करत युद्धविरामाची घोषणा केली आहे. युद्धविरामाची घोषणा करताना इराणने अमेरिकेसमोर त्यांच्या 10 अटी ठेवल्या होत्या. तर त्या 10 अमेरिकेने मान्य केल्या असून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. तर इराणने देखील अमेरिकेच्या अटी मान्य केल्या आहेत. एकिकेड युद्धविराम जाहीर झाल्यानंतर काही तासांतच बुधवारी (8 एप्रिल) दुपारी इस्रायलने (Israel) लेबनॉनची राजधानी बेरूतवर (Beirut) अचानक हल्ला केला.

हेही वाचा – भोंदूबाबा खरात प्रकरणावर शर्मिला ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, “त्याच्यासोबत असलेल्या महिला…”

इस्त्रायलचा बेरूतवर भीषण हल्ला

कोणतीही पूर्वसूचना न देता इस्त्रायने बेरूतच्या दाट लोकवस्तीच्या भागांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्याबाबत इस्रायलने सांगितले की, इराणसोबतचा युद्धविराम लेबनॉनमधील इराण-समर्थित हिजबुल्ला गटाविरुद्धच्या लढ्याला लागू होत नाही.

इस्त्रायने केलेल्या हल्ल्यांनंतर बेरूतच्या अनेक भागांवर आकाशातून दाट काळ्या धुराचे लोट पसरले होते. तेथील एका निवासी इमारतीला भीषण आग लागली होची आणि अनेक वाहनांचे नुकसानही झाले आहे. यातील अनेक हल्ले हे दुकाने आणि बाजारपेठा असलेल्या गर्दीच्या भागांमध्ये झाले आहेत. तर आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यांमध्ये 112 जण ठार झाले आहेत. तर 837 जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे संबंधित भागातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

युद्धबंदीनंतरही तणाव वाढणार?

इस्रायली लष्कराने हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना, कमांड सेंटर्सना आणि गुप्तचर यंत्रणांना टार्गेट केल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे इस्त्रायने केलेल्या हल्ल्यापूर्वी हिजबुल्लाहच्या एका अधिकाऱ्याने असोसिएटेड प्रेसला सांगितले की, त्यांचा गट लेबनॉनमध्ये युद्धविराम घडवून आणण्यासाठी मध्यस्थांना एक संधी देत ​​आहे. “आम्ही अद्याप युद्धविराम जाहीर केलेला नाही कारण इस्रायल त्याचे पालन करत नाहीये. 2 मार्चपूर्वीची परिस्थिती हिजबुल्लाह सहन करणार नाही. इस्रायलने पूर्वीप्रमाणेच हल्ले सुरू ठेवले असून आम्ही हे सहन करणार नाही. हे असेच सुरू राहावे असे आम्हाला वाटत नाही,” असं अधिकारी म्हणाला.

काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला होता त्यावेळी हिजबुल्लाहने सीमेपलीकडून इस्रायलमध्ये क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले होते. तर इस्रायलने लेबनॉनवर जोरदार बॉम्बहल्ला करून त्याला प्रत्युत्तर दिले होते. तसेच आता इराणसोबत युद्धबंदीची घोषणा करण्यात आली असली तरीही लेबनॉनमधील तणाव वाढत असल्याचं चित्र दिसत आहे.

दरम्यान, युद्धबंदीच्या करारात मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानने म्हटले होते की, इराणसोबतच्या दोन आठवड्यांच्या युद्धबंदीमुळे इस्रायलला लेबनॉनमधील हल्ले थांबवणेही बंधनकारक आहे. मात्र, इस्रायलने याचे पालन करण्यास नकार दिला आहे. इस्रायली सैन्याने मध्य बैरूत, दक्षिण लेबनॉन आणि पूर्व बेका खोऱ्यात मोठे हल्ले केले आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts