Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मुंबई विमानतळ टर्मिनल-१ मध्ये किरकोळ आग; प्रवाशांमध्ये घबराट, मोठी दुर्घटना टळली
Mumbai

मुंबई विमानतळ टर्मिनल-१ मध्ये किरकोळ आग; प्रवाशांमध्ये घबराट, मोठी दुर्घटना टळली

Mumbai airpot

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-१ मध्ये किरकोळ आग लागल्याची घटना घडली. यावेळी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे.

मुंबईतील छात्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (CSMIA) डोमेस्टिक टर्मिनल-१ (Terminal 1 fire incident) मध्ये गुरुवारी सायंकाळी किरकोळ आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही वेळ प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा: “…तर ‘लाडकी बहीण’ योजना बंद करून टाका”, हायकोर्टाने राज्य सरकारला खडसावलं, नेमकं कारण काय?

ही आग टर्मिनल-१ च्या तळमजल्यावरील ‘१ बी सर्कल’ परिसरात सायंकाळी सुमारे ६:१० वाजता लागल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

आग लागल्यानंतर विमानतळ प्रशासनाने तत्काळ हालचाल करत सुरक्षेची उपाययोजना केली. धूर वरच्या मजल्यांपर्यंत पसरल्यामुळे काही प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

https://x.com/fpjindia/status/2042262242880872456?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2042262242880872456%7Ctwgr%5E3ba53e11e1f863be04e28e6d5f53f1990d0e3d89%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.freepressjournal.in%2Fmumbai%2Fmumbai-csmia-terminal-1-minor-fire-incident-airport-update

एअरपोर्टची ‘एअरोड्रोम रेस्क्यू अँड फायर फायटिंग’ (ARFF) टीम आणि मुंबई (Mumbai airport latest news) अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून आग आटोक्यात आणली. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वायर डक्टमध्ये आग लागल्याने काही काळ इंटरनेट सेवांवर परिणाम झाला.

विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विमानतळाचे कामकाजही सुरळीत सुरू ठेवण्यात आले आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts