Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अखेर चेन्नईनं मिळवला हंगामातील पहिला विजय; संजूची शतकी खेळी ठरली निर्णायक
क्रीडा

अखेर चेन्नईनं मिळवला हंगामातील पहिला विजय; संजूची शतकी खेळी ठरली निर्णायक

अखेर चेन्नईनं मिळवला हंगामातील पहिला विजय; संजूची शतकी खेळी ठरली निर्णायक

चेन्नई CSK Beat DC : आयपीएल 2026 चा 18वा सामना चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 23 धावांनी पराभव केला. या हंगामातील दिल्लीचा हा सलग दुसरा पराभव होता. तर सलग तीन पराभवांनंतर चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएल 2026 मधील आपला पहिला सामना जिंकला. चेन्नईनं दिलेलं 213 धावांचं लक्ष्य गाठताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ 20 षटकांत 189 धावांवर सर्वबाद झाला.

नाणेफेक गमावल्यानंतर CSK ची प्रथम फलंदाजी :

एमए चिदंबरम स्टेडियमवर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सीएसकेनं निर्धारित 20 षटकांत दोन गडी गमावून 212 धावा केल्या. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी 6.2 षटकांत 62 धावांची भागीदारी करून संघाला भक्कम सुरुवात करून दिली. गायकवाडनं एका चौकारासह 18 चेंडूंमध्ये 15 धावा केल्या. त्यानंतर संजूनं आयुष म्हात्रेसोबत 68 चेंडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 113 धावा जोडून संघाला 175 धावांपर्यंत पोहोचवलं. म्हात्रेनं चार षटकार आणि तीन चौकारांसह 36 चेंडूंमध्ये 59 धावा करून निवृत्ती घेतली.

संजू सॅमसनचं चौथं शतक :

त्यानंतर संजूनं 52 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं, जे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील चौथं शतक आहे. संजूनं शिवम दुबेसोबत तिसऱ्या विकेटसाठी 15 चेंडूंमध्ये नाबाद 37 धावांची भागीदारी करुन संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. संजू 56 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 15 चौकारांसह 115 धावांवर नाबाद राहिला, तर दुबे 3 चौकारांसह 10 चेंडूंमध्ये 20 धावांवर नाबाद राहिला. दिल्ली कॅपिटल्सला एकमेव यश कर्णधार अक्षर पटेलनं मिळवलं, ज्यानं 4 षटकांत 39 धावा देऊन 1 बळी घेतला.

ट्रिस्टन स्टब्स आणि पथुम निस्संकाची खेळी व्यर्थ :

चेन्नईनं दिलेल्या 213 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून ट्रिस्टन स्टब्सनं सर्वाधिक 60 धावा केल्या. पथुम निस्संकानंही 41 धावांची शानदार खेळी केली. मात्र, इतर कोणत्याही खेळाडूनं फलंदाजीत लक्षणीय योगदान दिलं नाही, ज्यामुळं दिल्लीला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. चेन्नई सुपर किंग्ससाठी जेमी ओव्हरटन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्यानं चार बळी घेतले. अंशुल कंबोजनंही तीन बळी घेतले. तर खलील अहमद, गुर्जपनीत सिंग आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts