Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • ‘दृश्यम 3’ दिग्दर्शकाच्या घरी किलबिलाट; पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खुशखबर
Top News

‘दृश्यम 3’ दिग्दर्शकाच्या घरी किलबिलाट; पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खुशखबर

Abhishek Pathak | ‘दृश्यम 3’ (Drishyam 3) चा दिग्दर्शक अभिषेक पाठक (Abhishek Pathak) आणि त्याची पत्नी अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय (Shivaleeka Oberoi) यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अभिषेक पाठकच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. शिवालिका आणि अभिषेक यांना एक गोंडस मुलगी झाली आहे. ही गोड बातमी अभिषेकने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.

हेही वाचा – कोणीतरी येणार येणार गं…, रणवीर-दीपिका पुन्हा होणार आई-बाबा; लेकीने दिली हटके अंदाजात गुड न्यूज

अभिषेक पाठकच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन

आज अभिषेक आणि शिवालिकाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहीले आहे की, “आमची छोटी देवी लक्ष्मी एका शुभ दिवशी आमच्या घरी आली आहे. हा एक शुद्ध स्वरूपातील आशीर्वाद आहे. तसेच एका क्षणात आमच्या हृदयाला एक नवीन अर्थ मिळाला आहे. खूप प्रेम आणि कृतज्ञतेसह, आम्ही आमच्या गोड मुलीचे स्वागत करतो. धन्य पालक: शिवलिका आणि अभिषेक, अशी खास पोस्ट अभिषेक आणि शिवालिकाने शेअर केली आहे. अभिषेक आणि शिवालिकाने ही गोड बातमी शेअर करताच त्यांच्या चाहत्यांनी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अभिषेक आणि शिवालिकाने फेब्रुवारी 2023 मध्ये गोव्यात विवाह केला होता. तर 19 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. तसेच अभिषेक आणि शिवालिका यांनी काही दिवसांपूर्वीच कुटुंब आणि जवळच्या मित्रांसोबत डोहाळेजेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर चर्चेत होते. तसेच आता, या प्रसिद्ध जोडप्याने कन्यारत्न प्राप्त झाल्याची घोषणा केली आहे.

अभिषेक पाठक हा एक प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहे. 2011 मध्ये आलेल्या “प्यार का पंचनामा” या हिट चित्रपटातून त्याने निर्माता म्हणून पदार्पण केले होते. तर अभिषेकने “दृश्यम 2” आणि “उजदा चमन” सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्याने “प्यार का पंचनामा,” “खुदा हाफिज,” आणि “सेक्शन 375” ची निर्मिती देखील केली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts